Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » विदेशीचा मुद्दा सोनियांनीच उपस्थित केला होता

विदेशीचा मुद्दा सोनियांनीच उपस्थित केला होता

=शरद पवार यांचा दावा=
sonia-pawarनवी दिल्ली, [११ डिसेंबर] – कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा आम्ही नाही, तर स्वत: सोनियांनीच उपस्थित केला होता, असा दावा राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे.
शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीला त्यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे, सोनिया गांधींच्या मूळ विदेशीच्या मुद्यावरून शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा कॉंग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली होती.
या मुलाखतीत पवार म्हणाले की, मे १९९९ मध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी अचानक एक कागद काढला आणि तो वाचायला सुरुवात केली. माझा जन्म विदेशातला असून, निवडणूक प्रचारात हा मुद्दा झाल्यास, पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल, याचा विचार करायला हवा. भाजपाने मूळ विदेशीचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनविल्याचे दिसत आहे. यावर प्रत्येकाने आपले मत मांडावे, असे सोनिया त्यावेळी म्हणाल्या होत्या. त्यावर सोनियांच्या अत्यंत विश्‍वासातील नेते पी. ए. संगमा म्हणाले की, सोनिया गांधी जन्माने विदेशी आहेत, हा आरोप शंभर टक्के होईल. जन्माने भारतीय असणार्‍या अनेक व्यक्ती पक्षात असताना, आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो, याचा अजिबातच परिणाम होणार नाही, असे मानणे चुकीचे ठरेल. पण, आपण या टीकेला उत्तर देण्यासाठी तयार असायला हवे. संगामा यांच्या मताशी मी देखील सहमत होतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
बैठकीनंतर मी दुपारी चारच्या विमानाने पुण्याला आलो. विमानतळावर मला पत्रकारांनी गाठले आणि सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. पण, विदेशीचा मुद्दा आम्ही नाही, तर सोनिया गांधींनी स्वत:च उपस्थित केला होता, असे पवार म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26136

Posted by on Dec 12 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1031 of 2453 articles)


=सोनियानिष्ठांनी आडकाठी आणली होती= नवी दिल्ली, [११ डिसेंबर] - राजीव गांधी यांच्या हत्येनंतर १९९१ मध्ये केंद्रात कॉंगे्रसच्या नेतृत्वात आघाडीचे सरकार ...

×