Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » विदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटींचा काळा पैसा

विदेशी बँकांमध्ये भारतीयांचा १३ हजार कोटींचा काळा पैसा

=परदेशातील संपत्तीची सरकारला मिळाली माहिती=
black_moneyनवी दिल्ली, [२७ जून] – भारतीयांनी विदेशातील बँकांमध्ये तब्बल १३ हजार कोटींचा काळा पैसा ठेवला असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. हे सरकारचे मोठे यश मानले जात आहे. भारतीय आयकर विभागाला २०११ आणि २०१३ च्या बँक खात्यांविषयीची माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
फ्रान्स सरकारकडून वर्ष २०११ मध्ये जिनेव्हाच्या एचएसबीसी बँकेत भारतीयांकडून पैसे जमा करण्यात आल्याचे सांगत तब्बल ४०० खात्यांविषयी सविस्तर माहिती सरकारला दिली आहे. या ४०० बँक खात्यांमध्ये ८,१८६ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. यानंतर २०१३ मध्ये इंटरनॅशनल कंजोर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट या संकेतस्थळावर ७०० भारतीयांच्या बँक खात्यांविषयी माहिती देण्यात आली होती. या खात्यांमध्ये त्यावेळी ५ हजार कोटी रू. जमा करण्यात आले होते, असे सांगण्यात आले आहे.
या दोन माहितीच्या आधारे विदेशी बँकांमध्ये एकूण ११०० खात्यांमध्ये १३ हजार कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून ही आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम असल्याचे समजते.
आता या संपत्तीवर आयकर विभागाकडून ५,३७७ कोटी एवढा कर लावला असून या खातेधारकांना विभागाने ३१ मार्च २०१६ पर्यंत कर भरण्याची संधी दिली होती. आतापर्यंत ६३८ खातेधारकांनी ३७७० कोटी रुपयांचा काळा पैसा असल्याचे घोषित केले असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
एवढेच नाही तर या खात्यांच्या व्यतिरीक्त एचएसबीसी बँकेत सरकारला आणखी ६२८ खात्यांची माहिती मिळाली होती. त्यातील २१३ खाते एक्टिव होते, तर २१३ खात्यांमध्ये पैसे जमा नव्हते. दरम्यान, आयकर विभागाने या खातेधारकांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28984

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (166 of 2453 articles)


=पंतप्रधानांचे प्रतिपादन= नवी दिल्ली, [२७ जून] - भारताने आतापर्यंत पाकसोबत अनेकदा जोखीमपूर्ण पुढाकार घेतला आहे. पण, आता मला असे वाटते ...

×