Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » विद्यार्थिनींसमोर झाली राहुल गांधींची नाचक्की

विद्यार्थिनींसमोर झाली राहुल गांधींची नाचक्की

=स्वच्छ भारत, मेक इन इंडियाच्या प्रश्नावर विद्यार्थिनींची चपराक=
rahul gandhi slaped by bengluru studentsबंगळुरू, [२५ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया अभियानावर नेहमीच टीका करणारे कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज बुधवारी बंगळुरू येथील विद्यार्थिनींनी याच मुद्यावर अक्षरश: बोलती बंद केली. स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया अभियान यशस्वी झाले काय, असा प्रश्‍न राहुल यांनी विचारला असता, बहुतेक सर्वच विद्यार्थिनींनी ‘होय’ असे उत्तर दिले.
बंगळुरू येथील माऊंट कार्मेल महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींशी संवाद साधताना, पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनांवर टीका करण्याचा मोह राहुल गांधी यांना आवरला नाही. शिक्षणाशी संबंधित मुद्दे सोडून त्यांनी मोदी सरकारवर टीका करीत, स्वच्छ भारत आणि मेक इन इंडिया अभियानाच्या यशाबाबत विचारणा केली. स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले, असे तुम्हाला मनापासून वाटते काय, असा प्रश्‍न त्यांनी केला असता, उपस्थित विद्यार्थिनींनी एकाच सुरात ‘होय’ असे उत्तर दिले. पहिल्या प्रश्‍नावर दांडी उडाल्यानंतरही त्यांनी मेक इन इंडियाच्या यशाबाबत विचारणा केली, तेव्हा विद्यार्थिनींनी पुन्हा ‘होय’ असेच उत्तर दणदणीत आवाजात दिले. यामुळे राहुल गांधी यांना अक्षरश: लाजिरवाणे वाटले. पण, एवढे होऊनही राहुल गांधी विद्यार्थिनींना म्हणाले की, तुमच्या आणि माझ्या मतात बराच फरक आहे. तुमच्याशी मी सहमत नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25749

Posted by on Nov 26 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1147 of 2453 articles)


=कानपूर येथील न्यायालयात याचिका दाखल= कानपूर, [२५ नोव्हेंबर] - भारत हा असुरक्षित देश असल्याने, हा देश सोडून जाण्याचा विचार माझ्या ...

×