Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » विधान परिषदेत अवघ्या १७ मिनिटांचेच कामकाज!

विधान परिषदेत अवघ्या १७ मिनिटांचेच कामकाज!

  • कर्जमाफीची मागणी विरोधकांनी रेटली •
  • सरकारची चर्चेची तयारी •
  • गोंधळ, नारेबाजीत दोनदा कामकाज तहकूब

vidhan-parishadनागपूर, [९ डिसेंबर] – विदर्भातील समस्या, येथील विकासात्मक कामे आदी अनेक कारणांसाठी नागपुरात दरवर्षी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बोलाविले जाते. यंदाही हे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, आज तिसर्‍या दिवशी विधान परिषदेत अवघ्या १७ मिनिटांचेच कामकाज होऊन परिषद उद्या गुरुवार दुपारपर्यंत तहकूब करण्यात आली. याला कारणाभूत ठरला सभागृहातील विरोधी पक्ष सदस्यांचा गोंधळ.
दुपारी बाराच्या ठोक्याला कामकाजाला सुरुवात होताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील जागेत गोळा होऊन नारेबाजी सुरू केली. या गोंधळातच बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, कापूस, संत्रा आणि इतरही पिकांना उचित भाव मिळाला पाहिजे. कर्जमाफी तातडीने दिली गेली पाहिजे. नागपुरात अधिवेशन सुरू असताना कालच झुणका येथील एका तरुण शेतकर्‍याने निव्वळ एक लाख रुपयांच्या कर्जापोटी आत्महत्या केली. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येवर अजूनही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
सरकार घोषणा करते, मात्र त्याची अंमलबजावणी काही होत नाही. अजूनही या गंभीर विषयाबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही मुंडे म्हणाले. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता सरकार नियम २८९ अंतर्गत चर्चा करायला तयार आहे. विरोधकांनीही त्यासाठी सहकार्य करावे. सध्या प्रश्‍नोत्तराचा तास घ्यायला हवा, अशी सूचना संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट यांनी केली. दरम्यान, कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनीही, कर्जमाफीची मागणी पूर्ण करा आणि नंतरच आम्ही चर्चेला तयार होऊ, असे मत मांडले. उपसभापती वसंत डावखरे यांनी प्रश्‍नोत्तराचा तास पुकारला. शिवसेना सदस्य नीलम गोर्‍हे यांनी शीना बोरा हत्या प्रकरणी प्रश्‍न विचारला. मंत्री रणजित पाटील उत्तर देण्यासाठी उभे राहिले असता विरोधकांचा गोंधळ वाढला. नारेबाजीलाही जोर आला. अखेर डावखरे यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.
नंतर कामकाजाला पुन्हा सुरुवात होताच विरोधकांच्या गोंधळातच भाजपा सदस्य पांडुरंग फुंडकर आणि प्रा. अनिल सोले यांनी आपले प्रश्‍न मांडले. अनिल सोले यांच्या प्रश्‍नाला रणजित पाटील उत्तर देत असताना विरोधकांच्या गोंधळामुळे उपसभापतींनी पुन्हा एकदा १५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. नंतर उपसभापती सभागृहात आले आणि कामकाज पुन्हा सुरू झाले. लगेच विरोधक त्यांच्या आसनासमोर गोळा होऊन नारेबाजी करू लागले. दुसर्‍याच क्षणी डावखरे यांनी परिषदेचे कामकाज उद्या गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यावेळी सभागृहातील घड्याळ १२ वाजून ४२ मिनिटे, अशी वेळ दर्शवित होते. याचा अर्थ आज परिषदेत फक्त १७ मिनिटेच कामकाज होऊ शकले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26098

Posted by on Dec 10 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1044 of 2451 articles)


=पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन= नागपूर, [९ डिसेंबर] - मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका ...

×