richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचे सीबीआयला निर्देश

विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचे सीबीआयला निर्देश

=केजरीवालांचा नवा आरोप=
arvind kejriwalनवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – केंद्र सरकार आणि दिल्लीत सत्तारूढ असलेला आम आदमी पक्ष यांच्यातील वाक्‌युद्ध आज आणखी पुढे गेले असून, विरोधकांना लक्ष्य करा आणि जे ऐकणार नाही त्यांना संपवून टाका, असे निर्देश केंद्राने सीबीआयला दिले असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
२०१३ पर्यंत १४ वर्षे दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष असलेले केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नेतृत्वात मोठा घोटाळा झाला असून, त्यांना पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी केजरीवाल यांच्या पक्षाने गुरुवारी केली होती. मात्र, जेटली यांनी केजरीवाल यांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत, केजरीवाल स्वत:च अडकल्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी बदनामी करण्याचा हा कट असल्याचे म्हटले होते.
‘विरोधी पक्षांना लक्ष्य करा आणि जे ऐकणार नाहीत त्यांना संपवा असे निर्देश केंद्राने दिल्याचे आपल्याला सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले’, असा आरोप केजरीवाल यांनी शुक्रवारी सकाळी केला. केजरीवाल यांनी स्वत: समोर येऊन हा आरोप न करता यासाठी सोशल मीडियाचाच वापर केला. मंगळवारी केजरीवाल यांनी प्रधान सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर सीबीआयने टाकलेल्या धाडीचा वृत्तांत सोशल साईटवर टाकला होता.
बिनबुडाचा आरोप
विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचे निर्देश सीबीआयला देण्यात आल्याचा अकरविंद केजरीवाल यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले. २६ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाप्रणीत रालोआ सरकार सत्तेत आल्यापासून सीबीआय स्वतंत्र असून, संस्थेच्या कारभारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही, असे सिंह यांनी सांगितले. शिवाय सीबीआयचा कोणताही अधिकारी सेवाकराराप्रमाणे गुप्त माहिती उघड करत नाही. त्यामुळे सीबीआय अधिकार्‍याच्या हवाल्याने असा आरोप करणे खोडसाळपणाचे आहे, असे जितेंद्रसिंह यांनी संसदभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26191

Posted by on 3:38 pm. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google