Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » वीरभद्र सिंहांच्या अडचणीत वाढ

वीरभद्र सिंहांच्या अडचणीत वाढ

=ईडीच्या तीन राज्यांमध्ये धाडी=
Virbhadra-Singhनवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरोधातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा तपास करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज शुक्रवारी तीन राज्यांमधील सुमारे १२ ते १५ ठिकाणी एकाचवेळी धाडी घातल्या.
राजधानी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या तीन शहरांमधील वीरभद्र सिंह आणि एफआयआरमध्ये नाव असलेल्या अन्य लोकांशी संबंधित कार्यालयीन संकुलांची ईडीच्या अधिकार्‍यांनी कसून झडती घेतली, अशी माहिती ईडीच्या अधिकार्‍याने दिली.
शुक्रवारी सकाळपासूनच ईडीच्या विविध पथकांनी ही मोहीम हाती घेतली होती. वीरभद्र यांच्या काही कंपन्यांकडून व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याचे पुरावे असल्याने इंडीने या व्यावसायिकांच्या ठिकाणांचीही झडती घेतली. या धाडीत ईडीला अनेक महत्त्वाचे दस्तावेज मिळाले असले, तरी त्याविषयी विस्तृत माहिती देण्यास अधिकार्‍याने नकार दिला आहे.
२००९ ते २०११ या काळात वीरभद्र सिंह केंद्रात पोलाद मंत्री असताना त्यांनी गैरमार्गांचा वापर करून सहा कोटी रुपयांची संपत्ती जमा केली असल्याचा सीबीआयचा आरोप असून, या प्रकरणी दाखल आरोपपत्राची दखल घेत, ईडीनेही गुन्हा नोंदवून ही कारवाई केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25584

Posted by on Nov 21 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1203 of 2453 articles)


केंद्रीय कर्मचार्‍यांची दिवाळी सातव्या वेतन आयोगाचा अहवाल सादर किमान वेतन १८ हजार नवी दिल्ली, [१९ नोव्हेंबर] - लाखो केंद्रीय ...

×