richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » वेण्टी फर्स्ट सेंच्युरीची ‘आप’ला कायदेशीर नोटीस

वेण्टी फर्स्ट सेंच्युरीची ‘आप’ला कायदेशीर नोटीस

Kejriwal6नवी दिल्ली, [१९ डिसेंबर] – दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) कथित घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह आपल्यावरही आरोप केल्याबद्दल ट्वेण्टी फर्स्ट सेंच्युरी मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ‘आप’ला कायदेशीर नोटीस बजावून विनाअट मागी मागण्यास सांगितले आहे.
कंपनीचे प्रबंध संचालक लोकश शर्मा यांनी शुक्रवारी रात्री आम आदमी पार्टीला कायदेशीर नोटीस बजावली आणि विनाअट माफी मागितली नाही, तर मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. डीडीसीए प्रकरणात या कंपनीने मोठे कमिशन घेतल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला होता. आपच्या नेत्यांनी अरुण जेटली व लोकेश शर्मा यांची बदनामी करणारे आणि तथ्य नसलेले खोटेनाटे आरोप केल्याचे, आशुतोष आणि संजय सिंह यांना बजावण्यात आलेल्या या कायदेशीर नोटीसमध्ये म्हटले आहे.
कोटला स्टेडियमवर उभारण्यात आलेले बॉक्स १० वर्षांसाठी ३६ कोटींमध्ये विकण्याची किंवा भाड्याने देण्याची जबाबदारी या कंपनीवर सोपविण्यात आली होती. यासाठी कंपनीने ५.४ कोटी रुपये कमिशन घेतले, असा आप नेत्यांचा आरोप आहे. मात्र, हे वक्तव्य निराधार आहे. यापोटी कंपनीला फक्त १,२४,१५,४१० रुपये कमिशन मिळाले आणि सेवा देण्यासाठी अतिरिक्त ६३,१६,६३० रुपये मिळाल्याचा कंपनीचा दावा आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26228

Posted by on 10:15 am. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google