Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » वैद्यकीय प्रवेश : केंद्र सरकार अध्यादेश काढणार

वैद्यकीय प्रवेश : केंद्र सरकार अध्यादेश काढणार

neet- medical enterence examनवी दिल्ली, [१६ मे] – सरकारी आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील एकाच प्रवेश परीक्षेच्या (नीट) माध्यमातून करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार सर्व राज्यांशी चर्चा करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
वैद्यकीय प्रवेश राष्ट्रीय स्तरावरील एकाच प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत, याला महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा विरोध आहे. किमान यावर्षी तरी हे प्रवेश राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येणार्‍या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून घेण्याची अनुमती द्यावी, अशी राज्य सरकारांची भूमिका आहे. या मुद्यावर देशातील सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी बोलावली होती.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार केला नाही, तर केंद्र सरकारला यासंदर्भात अध्यादेश काढावा लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आज राजधानी दिल्लीत दिवसभर चाललेल्या घडामोडींनंतर या आशयाचे संकेत मिळाले आहेत.
प्रत्येक राज्यातील शिक्षण मंडळ, त्यांचे अभ्यासक्रम वेगवेगळे आहे, राज्यांच्या भाषाही वेगळ्या आहेत, याकडे लक्ष वेधत जेटली म्हणाले की, अशा परिस्थितीत वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या आणि भाषांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या नावावर एका व्यासपीठावर आणणे अन्यायकारक आहे. हा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे. मात्र, यातून सर्वमान्य तोडगा निघाला नाही तर मात्र सरकारला हस्तक्षेप करावा लागेल. देशातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार यासंदर्भात अध्यादेश काढणार असल्याचे संकेतही जेटली यांनी यावेळी दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अनेक राज्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे स्वत: अरुण जेटली यांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28276

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (338 of 2450 articles)


नवी दिल्ली, [१६ मे] - बेरोजगारी आणि औद्योगिक विकासातील अडथळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या दुसर्‍या कारकीर्दीवर अनिश्‍चिततेची टांगती ...

×