Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » व्हाईट हाऊसवर हल्ल्याची इसिसची धमकी

व्हाईट हाऊसवर हल्ल्याची इसिसची धमकी

=नवा व्हिडीओ जारी=
white-houseवॉशिंग्टन, [२० नोव्हेंबर] – इराक आणि सीरियासह अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया असलेल्या आणि गेल्या आठवड्यात फ्रान्सची राजधानी पॅरिसवर मुंबईसारखा हल्ला करणार्‍या इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने आता थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसवर मोठा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
याबाबतचा नवा व्हिडीओ इसिसने नुकताच जारी केला आहे. मध्य-पूर्वेतील मीडिया रिसर्च संस्थेच्या मते, ‘पॅरिस बिफोर रोम’ या नावाचा हा व्हिडीओ सहा मिनिटांचा आहे. यात इसिसचा एक दहशतवादी फ्रान्स येथील स्मारके तसेच व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याची धमकी देत असल्याचे दिसत आहे. सोबत पॅरिसमध्ये पुन्हा हल्ला करण्याचीही धमकीही त्याने दिली आहे.
आम्ही पॅरिसपासून हल्ल्याची सुरुवात केली आणि व्हाईट हाऊसवर याचा शेवट केला जाईल. ज्याप्रमाणे आम्ही पॅरिसमधील स्मारके उडवली, त्याप्रमाणे व्हाईट हाऊसला उडवून देऊ. तुम्ही जिथे जाल, तिथे आम्ही तुमचा पाठलाग करू आणि तुम्हाला ठार मारू. तुमच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मानवी बॉम्ब आणि कारबॉम्ब तयार केले आहेत, अशी धमकी या अतिरेक्याने आणि इसिसच्या काही बड्या नेत्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फॅ्रन्कोईस होलांद यांना दिली आहे.
विशेष म्हणजे, इसिसने बुधवारी न्यूयॉर्कवर हल्ला करण्याची धमकी देणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. यात, आमचा पुढील निशाणा न्यूयॉर्क असेल, असे म्हटले होते. त्यानंतर गुुरुवारी इसिसने थेट व्हाईट हाऊसवर हल्याची धमकी दिल्याने ओबामा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25594

Posted by on Nov 21 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1205 of 2458 articles)


=सुरक्षा व्यवस्था कडक= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] - इंडोनेशिया पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतात आणण्यात आलेल्या अंडरवर्ल्डचा कुख्यात डॉन छोटा राजनची ...

×