richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शाहरुखच्या ‘दिलवाले’विरुद्ध तीव्र निदर्शने

शाहरुखच्या ‘दिलवाले’विरुद्ध तीव्र निदर्शने

=बाजीराव मस्तानीलाही जोरदार विरोध, कोल्हापूर, पुण्यात शो बंद पाडले=

Right wing groups protest against the screening of Bollywood film Dilwale in New Delhi, India on December 18, 2015. The agitation was against the statement made by Shahrukh Khan, against rising intolerance in India last month. (Jyoti Kapoor/SOLARIS IMAGES)

नवी दिल्ली, [१८ डिसेंबर] – पुण्यात बाजीराव मस्तानी चित्रपटाला भाजपाने विरोध केला असताना, तिकडे गुजरातच्या सूरतमध्ये शाहरुख-काजोलच्या दिलवाले सिनेमालाही विरोधाचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलवाले विरोधात तीव्र निदर्शने केली.
सूरतच्या राजहंस चित्रपटगृहाबाहेर निदर्शने करणार्‍या १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय गोरखपूरमध्येही शिवराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. तर अलाहाबादमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी दिलवालेला विरोध केला.
शाहरुखच्या कथित असहिष्णुतेबाबतच्या वक्तव्यावरून दिलवाले सिनेमाला चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे. चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांची निदर्शने
बहुचर्चित बाजीराव-मस्तानी चित्रपटाला भाजपाने विरोध दर्शवला आहे. पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोेलनाचा इशारा दिल्यानंतर सिटीप्राईड चित्रपटगृहातील बाजीराव-मस्तानीचे आजचे सर्व खेळ रद्द करावे लागले आहेत. चित्रपटातील गाण्यांमुळे बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच वादाच्या भोवर्‍यात सापडला होता.
भाजपाच्या पुण्यातील कोथरुड शाखेने सिटीप्राईड चित्रपटगृहाच्या मालकांना बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित केल्यास होणार्‍या नुकसानाची जबाबदारी चित्रपटगृह मालक आणि संचालकांची असेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आज सकाळी बाजीराव-मस्तानीचा सकाळी ८ वाजताचा खेळ सुरू होण्याआधी सिटीप्राईड चित्रपटगृहाबाहेर भाजपा कार्यकर्ते जमा झाले आणि चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने चित्रपटगृहाने बाजीराव-मस्तानीचे आजचे सर्व खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. भाजपा कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स देखील काढून टाकले. या चित्रपटातून भारतीय इतिहासाचे विकृतीकरण केल्याने तो प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सिटीप्राईडप्रमाणेच इतर चित्रपटगृहांबाहेर देखील या चित्रपटाविरोधात आंदोलन करणार असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26198

Posted by on 4:26 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google