Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून प्रचंड गोंधळ

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवरून प्रचंड गोंधळ

=विधान परिषदेत गाजली स्थगिती, सभापतींच्या इशार्‍यानंतरही सदस्यांचा गदारोळ सुरूच=
vidhan-sabha ngpनागपूर, [८ डिसेंबर] – अवघ्या एका तासात दोनदा स्थगिती, हे नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेतील दुसर्‍या दिवशीच्या कामकाजाचे वैशिष्ट्ये ठरले.
आज मंगळवारी दुपारी बाराच्या ठोक्याला सभापती रामराजे निंबाळकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. कामकाजाची सुरुवात होत नाही, तोच माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या आणि धनंजय मुंडेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभापती समोरच्या जागेचा ताबा घेतला. शेतकर्‍यांची कर्जमाफी झालीच पाहिजे यासह अनेक मुद्यांचा समावेश असलेली फलके हाती घेऊन या सदस्यांनी सरकारविरुद्ध नारेबाजी सुरू केली. विरोधी सदस्यांनी हाती फलक घेऊन सभापतींच्या समोरील जागेचा ताबा घेण्याची बाब नियमानुसार नसल्याचे संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर सभापतींनी विरोधी सदस्यांना तंबी दिली. तरीही त्यांचा गोंधळ सुरूच होता. शेतकर्‍यांच्या आत्महत्या आणि शेतकर्‍यांची कर्जमाफी हे विषय घेऊन विरोधी सदस्य गोंधळ घालत असतात. सत्तापक्षाकडून बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, हा विषय चिघळायला याआधीचे कॉंग्रेस-राकॉं आघाडीचे सरकार जबाबदार असून, आज विरोधकांचा हा गोंधळ म्हणजे ‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ असा असल्याची टीका केली. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आदी विषयांचे गांभीर्य लक्षात घेता विरोधकांनी चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहनही खडसे यांनी केले.
गोंधळ काही कमी होत नसल्याचे दिसून आल्यानंतर सभापती निंबाळकर यांनी अर्धा तासासाठी कामकाज तहकूब केले. १२ वाजून ४० मिनिटांनी पुन्हा कामकाज सुरू होताच विरोधकांनी पुन्हा गोंधळ घालणे सुरू केले. फलक दाखविणे आणि नारेबाजी यामुळे उपसभापती वसंत डावखोरे यांनी १५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित केले. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर सभापती निंबाळकर यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला सुरुवात न करता दुसर्‍या विषयापासून कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी विविध खात्यांचे तीन अध्यादेश पटलावर ठेवले. त्यानंतर पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या. यावेळी कॉंग्रेस सदस्य अनुपस्थित होते आणि राकॉंचे सदस्य गोंधळ घालत होते. अखेर सभापती निंबाळकर यांनी दुपारी एकच्या सुमारास दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26050

Posted by on Dec 8 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1060 of 2451 articles)


नवी दिल्ली, [८ डिसेंबर] - भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि जनतेच्या पैशांची केलेली लूट लपवण्यासाठी कॉंग्रेस पक्ष न्यायालयीन कारवाईचे निमित्त करीत ...

×