Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

श्री श्री रविशंकर यांचा ब्रिटनकडून सन्मान

Sri-Sri-Ravi-Shankar-in-Berlinलंडन, [२७ जून] – आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांना ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या संस्थेतर्फे मानद फेलोशिप बहाल करण्यात आली. संपूर्ण जगात शांतता व संस्कृतीकरिता त्यांच्या कार्याप्रीत्यर्थ हा सन्मान त्यांना देण्यात आल्याचे कळते.
नॅशनल इंडियन स्टूडंट्‌स अँड ऍलम्नी युनियन (निसाऊ) यांच्यातर्फे ही घोषणा करण्यात आली आहे. ही संस्था सामाजिक विकास व बदल यांतर्गत काम करते. ब्रिटनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीय युवकांच्या मनात वसुधैव कुटुम्बकम् आणि सत्यमेव जयते हा विचार रुजवण्याचा आमचा मानस असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे. श्री श्री रविशंकर यांनी योगा, ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासाद्वारे जगभरात केलेल्या कामाचा उपयोग सर्व तरुणांना होत असल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात येत असल्याचे निसाऊचे अध्यक्ष सनम अरोरा यांनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28969

Posted by on Jun 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (173 of 2458 articles)


=केंद्रीय मंत्रिमंडळाची उद्या बैठक, पंतप्रधानांनी मागितला अहवाल= नवी दिल्ली, [२७ जून] - सातव्या वेतन आयोगाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

×