richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » संजय दत्त जेलमधून लवकर सुटणार

संजय दत्त जेलमधून लवकर सुटणार

Sanjay-Dutt-812मुंबई, [१९ डिसेंबर] – मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त पुढील वर्षी फेबु्रवारी महिन्यात म्हणजे दीड वर्ष आधीच तुरुंगातून सुटण्याची शक्यता आहे. संजय दत्तला वर्षागणिक तब्बल ११४ दिवसांची सुटी मिळते. त्यामुळे संजय दत्त दीडवर्ष आधीच बाहेर येण्याची शक्यता आहे.
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तची १६ मे २०१३ ला येरवाडा कारागृहात रवानगी झाली होती. सुप्रीम कोर्टाने त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी दीड वर्षांची शिक्षा संजय दत्तने आधीच भोगली होती. त्यामुळे केवळ साडेतीन वर्षंच त्याला शिक्षा भोगायची होती.
संजय दत्त जवळपास दीड वर्ष आधीच सुटणार असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. यापार्श्‍वभूमीवर अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषण उपाध्याय यांनी सांगितले की, जेल मॅन्युअलच्या नियमानुसार, प्रत्येक कैद्याचे महिन्याच्या ३० दिवसांपैकी ७ दिवस माफ केले जातात. त्यानुसार वर्षभरात ८४ दिवसांची शिक्षा कमी होते. त्यात जर कैद्याचं तुरूंगातील वर्तन चांगलं असेल तर प्रत्येक वर्षी आणखी ३० दिवसांची शिक्षा माफ होते. यानुसार संजय दत्तची वर्षाला ११४ तर पाच वर्षात ५७० म्हणजे दीड वर्षाची शिक्षा माफ केली जाते.
यानुसार संजय दत्त दीड वर्षाआधीच तुरूंगातून सुटणार आहे. त्याला कोणतीही नियमबाह्य सवलत देण्यात आली नाही , असे तुरूंग प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26222

Posted by on 10:06 am. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google