Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली

संपुआने देशाची तिजोरी रिकामी केली

=अमित शाह यांचा आरोप=
amit_shah1दाहोद, [१५ मे] – कॉंगे्रसप्रणीत संपुआने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात देशाची तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. तिजोरीत खडखडाट असल्याने भाजपाप्रणीत रालोआ सरकारला गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात अनेक अडचणी जात आहेत, असा हल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रविवारी येथे चढविला.
प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेच्या दुसर्‍या टप्प्याचा गुजरातच्या दाहोद येथे शुभारंभ करताना अमित शाह बोलत होते. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी अन्नधान्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी देशवासीयांना एकवेळच्या जेवणाचा स्वेच्छेने त्याग करण्याचे आवाहन केले होते. त्याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबांना एलपीजी गॅस मिळावा यासाठी बाजारभावाने गॅस सिलेंडर खरेदी करू शकणार्‍या नागरिकांना सब्‌सिडी सोडावी, असे आवाहन केले आहे, असे अमित शाह म्हणाले. यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
नरेंद्र मोदी सरकार गरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि त्या दिशेने योजनांची अंमलबजावणीही सुरू आहे. पण, संपुआ सरकारने दहा वर्षांच्या सत्ताकाळात तिजोरी रिकामी केली. त्यामुळे मनात असूनही या सर्व योजना प्रभावीपणे राबविणे मोदी सरकारला अडचणीचे जात आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम भ्रष्टाचार रोखण्याच्या दिशेने कठोर पावले उचलली. एलपीजीवर मिळणारी सब्‌सिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून काळा बाजारावरही त्यांनी आळा घातला, असेही शाह यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28258

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (346 of 2453 articles)


मुंबई, [१६ मे] - दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. ...

×