Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » संपुआने मुक्त केलेला अतिरेकी पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार

संपुआने मुक्त केलेला अतिरेकी पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार

=समोर आली धक्कादायक माहिती=
Jaish e Mohammad member, Shahid Latif, was released from Indian jails as a gesture of goodwill by the Manmohan Singh led UPA government in 2010नवी दिल्ली, [१७ मे] – पंजाबच्या पठाणकोट येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळावर गेल्या २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मदच्या ज्या अतिरेक्याने पठाणकोटमधील हल्लेखोरांना मोबाईलवरून हाताळले होते, त्या अतिरेक्याची मुक्तता संपुआ सरकारनेच पाकिस्तानचे लाड पुरविण्यासाठी केली होती, असे वास्तव उघडकीस आले आहे.
उच्चस्तरीय सूत्राच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारने २०१० मध्ये पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्याच्या राजनयिक प्रयत्नांचा भाग म्हणून जैशचा वरिष्ठ सदस्य असलेल्या शाहिद लतिफला मुक्त केले होते आणि हाच लतिफ पठाणकोट हल्ल्यातील अतिरेक्यांना हल्ला कसा करायचा, याबाबतचे निर्देश मोबाईलवरून देत होता, असे या वृत्तात म्हटले आहे.
दहशतवादी कारवायांमध्ये भारतीय तपास यंत्रणांनी लतिफला अटक केली होती. सुमारे ११ वर्षे तो तुरुंगात होता. लतिफसोबतच लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि जैश यासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित २५ अतिरेक्यांना तत्कालिन संपुआ सरकारने मुक्त केले होते. पाकसोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता, असे सूत्राने सांगितले. या निर्णयानुसार जम्मू, श्रीनगर, आग्रा, वाराणसी, नैनी आणि दिल्लीच्या तिहार येथील कारागृहात ठेवण्यात आलेल्या या दहशतवाद्यांना वाघा सीमेवरून पाकिस्तानला पाठविण्यात आले होते. आमच्या नागरिकांना मुक्त केल्यास भारत-पाक संबंध सुधारतील आणि भारताची पाकमधील प्रतिमा सुधारेल, अशी भूमिका पाक सरकारकडून घेण्यात आली होती.
विशेष म्हणजे, डिसेंबर १९९९ मध्ये दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या आयसी-८१४ या विमानाचे अपहरण केल्यानंतर १५४ प्रवाशांच्या बदल्यात जैशचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर आणि लतिफच्या सुटकेची मागणी केली होती. मात्र, तत्कालीन वाजपेयी सरकारने लतिफच्या सुटकेची मागणी फेटाळून लावली होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28301

Posted by on May 17 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (330 of 2453 articles)


=अधिभार हटविला= मुंबई, [१७ मे] - पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणारा राज्य विशेष अधिभार रद्द करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झाल्याने ...

×