Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सन्मान परत करणे, जाळणे अयोग्य : ऍडमिरल प्रकाश

सन्मान परत करणे, जाळणे अयोग्य : ऍडमिरल प्रकाश

admiral_arun_prakashहैदराबाद, [१९ नोव्हेंबर] – केंद्र सरकारने लागू केलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेच्या विरोधात माजी सैनिकांनी सन्मान परत करणे किंवा ते जाळणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे मत माजी नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केले असून, असे करण्याऐवजी माजी सैनिकांनी सरकारशी चर्चेच्या मार्गाचा अवलंब करावा किंवा न्यायालयात दाद मागावी, असा सल्ला दिला आहे.
वर रँक, वन पेन्शनबाबत सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेविषयी मला फारशी माहिती नाही. मात्र, वरिष्ठ माजी सैनिकांच्या मागण्यांबाबत समाधानकारक प्रगती झाली असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे माजी सैनिकांनी सरकारशी चर्चा करून यावर तोडगा काढावा, असे ऍडमिरल प्रकाश यांनी येथील कॉलेज ऑफ डिफेन्समध्ये आयोजित एका परिसंवादाच्या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तरीही समाधान झाले नाही, तर न्यायालयात दाद मागण्यासह इतर काही पर्याय असताना मेडल्स जाळणे योग्य नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे. बहाल करण्यात आलेली पदकं हा त्या व्यक्तीचा सन्मान असतो. त्यामुळे ती जपून ठेवली पाहिजे. ती परत करण्यासाठी किंवा जाळण्यासाठी नसतात, असे स्पष्ट मत ऍडमिरल प्रकाश यांनी व्यक्त केले. कोणत्याही सैनिकासाठी पदक हे अमूल्य असते. त्यामुळे पदक परत करणे किंवा ते जाळण्याच्या धोरणाचा फेरविचार व्हावा, असेही ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25570

Posted by on Nov 19 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1207 of 2453 articles)


पॅरिस, [१९ नोव्हेंबर] - इस्लामी दहशवाद्यांकडून फ्रान्समध्ये रासायनिक किंवा जैविक हल्ला होऊ शकतो, अशी शंका त्या देशाचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स ...

×