Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » सपा, बसपा, कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपात

सपा, बसपा, कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपात

Uttar-Pradeshलखनौ, [११ ऑगस्ट] – देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आतापासूनच सुरू झाली असून, सपा, बसपा आणि कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी आपापल्या पक्षाचा त्याग करून गुरुवारी भाजपात प्रवेश केला.
राजधानी लखनौ येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी या आमदारांना भाजपाचे सदस्यत्व प्रदान केले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्या आमदारांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले त्यामध्ये कॉंग्रेसचे विजय दुबे, संजय प्रताप जयस्वाल, माधुरी वर्मा आणि बसपाचे बालाप्रसाद अवस्थी, राजेश त्रिपाठी व सपाचे शेर बहादूर यांचा समावेश आहे. सपा व कॉंग्रेसच्या या आमदारांनी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केले होते.
काही दिवसांपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांच्यावर तिकिटांची विक्री करण्याचा गंभीर आरोप करून पक्षत्याग करणारे स्वामिप्रसाद मौर्य यांनी दोनच दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. स्वामिप्रसाद मौर्य यांनीच बसपाच्या या आमदारांना भाजपात आणल्याचे समजते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29183

Posted by on Aug 12 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (128 of 2452 articles)


नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेची एकमताने मंजुरी नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - जीएसटीमुळे देशात आर्थिक क्रांती होईल, ...

×