Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » समान नागरी कायदा आमच्या कक्षेबाहेर

समान नागरी कायदा आमच्या कक्षेबाहेर

=सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निर्वाळा=
supreme_court_1नवी दिल्ली, [७ डिसेंबर] – मुस्लिम महिलांबाबत होत असलेला पक्षपात संपुष्टात आणण्यासाठी समान नागरी कायदा तयार करण्यासाठी संसदेला आवश्यक ते निर्देश देण्यात यावे, अशी विनंती करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज सोमवारी नकार दिला. समान नागरी कायदा न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येत नाही, असा स्पष्ट निर्वाळा यावेळी न्यायालयाने दिला.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने ही याचिका फेटाळून लावताना, समान नागरी कायद्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ संसदेलाच असल्याने आम्ही त्यात कुठलाच हस्तक्षेप करू शकत नाही, असे सांगितले.
ही याचिका कायद्याशी सुसंगत नाही. अशा याचिका जर न्यायालयात दाखल होत राहिल्या, तर न्यायालय टीकेचे लक्ष्य बनेल, असे सरन्यायाधीशांनी यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले वरिष्ठ कायदेतज्ज्ञ गोपाल सुब्रह्मण्यम यांना सांगितले. वरिष्ठ वकील अश्‍विनीकुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. ज्या मुस्लिम महिलांना पक्षपाताचा सामना करावा लागतो, त्याच महिला आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समोर का येत नाहीत, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26036

Posted by on Dec 8 2015. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1067 of 2453 articles)


=प्रवीण तोगडिया यांचा विश्‍वास= भोपाळ, [७ डिसेंबर] - अयोध्या ही भगवान श्रीरामचंद्राचीच जन्मभूमी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणीत ...

×