richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ‘समृद्ध जीवन’च्या ५८ कार्यालयावर सीबीआयचे छापे

‘समृद्ध जीवन’च्या ५८ कार्यालयावर सीबीआयचे छापे

MAHESH-KISAN-MOTEWAR Samruddha Jeevanपुणे, [२९ डिसेंबर] – ‘समृद्ध जीवन’ च्या माध्यमातून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘समृद्ध जीवन’ चे संचालक महेश मोतेवार यांच्या विविध कंपन्यांच्या कार्यालयावर केंद्रीय अन्वेषण विभागाने आज मंगळवारी छापे टाकले आहे. ‘समृद्ध जीवन’च्या पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सोलापूरमधील ५८ कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारण्यास ‘सेबी’ ने मनाई केल्यानंतरही ‘समृद्ध जीवन’ चा संचालक महेश मोतेवार याने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांकडून पैसे गोळा केले. मोतेवार याच्यासह वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल, राजेंद्र भंडारे यांच्याविरूद्ध पुण्यातील डेक्कन आणि चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.तसेच उस्मानाबाद जिल्हयातील मुरूम पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून ते फरार होते. काल सोमवारी दुपारी उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून मोतेवार यांना ताब्यात घेतले. डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमीष दाखवून ३५ लाख रूपयांनी फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा येथील न्यायालयाच्या आदेशाने मोतेवार यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
‘सेबी’ चे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनावणे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती. या प्रकरणी सीबीआयकडून छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर ‘समृद्ध जीवन’ च्या संचालकांच्या मालमत्तांवरही छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. फसवणुकीच्या गुन्हयात मोतेवारला उमरगामधील न्यायालयाने ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26307

Posted by on 10:16 pm. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google