Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक » सरसंघचालकांचे सफाई कर्मचार्‍यांसोबत सहभोजन

सरसंघचालकांचे सफाई कर्मचार्‍यांसोबत सहभोजन

DR MOHAN BHAGWATउज्जैन, [१३ मे] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सध्या उज्जैन येथे सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ठिकाणी स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणार्‍या शेकडो कर्मचार्‍यांसोबत शुक्रवारी भोजन केले.
डॉ. मोहनजी भागवत यांनी येथील श्री गुरू कर्शानाईक आश्रमात सफाई कर्मचार्‍यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. आश्रमाच्या व्यवस्थापनाने सुमारे १२०० कर्मचार्‍यांना यासाठी बोलावले होते. यावेळी पुरुष कर्मचार्‍यांना भेटवस्तूच्या रूपात शर्ट-पॅण्ट आणि स्त्री कर्मचार्‍यांना साडी व प्रत्येकी शंभर रुपये भेट म्हणून देण्यात आले, अशी माहिती आश्रमाचे स्वामी ओंकारनंदजी यांनी दिली.
सरसंघचालकांनी गुरुवारी आदिवासी समुदायाच्या लोकांसोबत क्षिप्रा नदीत पवित्र स्नानही केले. याशिवाय व्हीकेपीने उज्जैन येथेच आयोजित केलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि इतर ठिकाणच्या आदिवासी समुदायाच्या जनजाती संमेलनातही मार्गदर्शन केले. हिंदू संस्कृतीची उत्पत्ती आदिवासी समुदायातूनच झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी गीता मनीषी श्रीगुरू शरणानंदजी, अखंड परमधामचे स्वामी परमात्मानंद, परमार्थ निकेतन केंद्र ऋषिकेशचे प्रमुख स्वामी चिदानंदजी, साध्वी ऋतंभरा, स्वामी गोविंद गिरीजी व स्वामी हरिदास महाराज यांच्यासह संत समाजाच्या अनेक प्रतिनिधींनी कर्मचार्‍यांसह सामूहिक भोजन केले. या कार्यक्रमामुळे आमचा आत्मसन्मान वाढला असून, नवी ऊर्जा मिळाली, असे मत काही कर्मचार्‍यांनी यावेळी व्यक्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28221

Posted by on May 14 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, सांस्कृतिक (359 of 2453 articles)


=राज्यसभा निवडणूक= [caption id="attachment_28036" align="alignleft" width="300"] New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday. ...

×