Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सर्वच अतिरेकी गटांचा नायनाट करा

सर्वच अतिरेकी गटांचा नायनाट करा

  • अमेरिकेने पुन्हा पाकला बजावले
  • पाकची भूमी दहशतवाद्यांचे स्वर्ग असायलाच नको

usa-pakistan flagsवॉशिंग्टन, [२० नोव्हेंबर] – दहशतवादात चांगला आणि वाईट असा फरक न करता, सर्वच दहशतवादी गटांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान सरकारने तातडीने आणि कठोर पावले उचलावी. सोबतच, जगात रक्तपात करीत असलेल्या दहशतवाद्यांसाठी पाकची भूमी यापुढे नंदनवन ठरायलाच नको, अशा शब्दात अमेरिकेने पाकला पुन्हा एकदा ठणकावले आहे.
पाकच्या भूमीत सक्रिय असलेल्या सर्वच दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निर्धार पाकने व्यक्त केला आहे आणि आम्ही यासाठी पाकचे स्वागत करतो. प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्यावर आम्ही पाकसोबत नेहमीच चर्चा सुरू ठेवणार आहोत. त्याचवेळी, पाकची भूमी यापुढे दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरणार नाही, यासाठी आम्हाला पाककडून ठोस पावलांची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी पाकचीच आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हक्कानी नेटवर्कसह सर्वच दहशतवादी गटांचा खात्मा झालेला आम्हाला बघायचा आहे. पाकचे लष्करप्रमुख राहिल शरीफ यांनी अलीकडेच अमेरिकेचा दौरा केला, त्यावेळी संरक्षण मंत्री ऍश्टन कार्टर यांनी त्यांना हाच कठोर संदेश दिला आहे, असे प्रवक्त्याने सांगितले.
दहशतवादविरोधी लढ्यात पाकला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत असते. या मदतीचा योग्य वापर व्हावा आणि पाकने खर्‍या अर्थाने दहशतवादविरोधी लढ्यात सहभागी व्हावे, अशीच आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25587

Posted by on Nov 21 2015. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (1207 of 2458 articles)


=ईडीच्या तीन राज्यांमध्ये धाडी= नवी दिल्ली, [२० नोव्हेंबर] - हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्याविरोधातील बेकायदेशीर सावकारी प्रकरणाचा तपास करणार्‍या ...

×