Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » सर्वात मोठी भरती येणार ६ जूनला

सर्वात मोठी भरती येणार ६ जूनला

SEA WATER WAVEमुंबई, [१६ मे] – दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना वेध लागले आहे ते पावसाचे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार आहे, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ६ जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती येणार आहे, अशी माहिती प्रख्यात खगोल अभ्यासक व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
पावसाच्या दिवसात मुंबईत समुद्राच्या भरतीच्या वेळेला पाणी साचण्याची भीती अधिक आहे. अशावेळी नगर पालिकेलाही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार आहे. त्यातच यंदाच्या पावसाळ्यात खास करून जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त मोठी भरती समुद्राला येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे. भरतीच्या पाण्याची उंची मीटरमध्ये दिली आहे. ही सुम्रद्राच्या पाण्याच्या लाटांची उंची नव्हे असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28255

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (343 of 2449 articles)


सुरत, [१५ मे] - विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांचे चुरत भाऊ भरत तोगडिया त्यांच्यासह तिघांच्या हत्येप्रकरणी सुरत पोलिसांनी आज रविवारी ...

×