richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक » सामाजिक समरसता अधोरेखित करणार

सामाजिक समरसता अधोरेखित करणार

=बाळासाहेब देवरस जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ=
Balasaheb devrasनागपूर, [१६ डिसेंबर] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दी वर्षाला बुधवार, १६ डिसेंबरपासून प्रारंभ झाला आहे. भारतीय कालगणनेनुसार मार्गशीर्ष शुक्ल पंचमी म्हणजे नागदिवाळी, हा बाळासाहेबांचा जन्मदिन आहे. या निमित्त समाजात समरसतेचा भाव रुजावा म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
समाजातील विविध घटकांप्रती मनात आत्मीय भाव जागरूक झाल्याशिवाय सामाजिक समरसता प्रस्थापित होणार नाही. या संदर्भातील चिंतन आणि तद्नुसार प्रयत्न फार आधीपासून संघाद्वारे सुरू आहेत. १९७४ साली पुणे येथील प्रसिद्ध वसंत व्याख्यानमालेत तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी ‘सामाजिक समता व हिंदू संघटन’ या विषयावर व्याख्यान दिले होते आणि संघाची या संदर्भातील भूमिका अधिक स्पष्ट केली होती. हे भाषण म्हणजे, सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात समरसतेच्या बाबतीत समाजातील विविध व्यक्ती, संस्था यांना जोडून, समाजात समरसतेचे प्रभावी वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नाला गती देण्याचा प्रयत्न होईल.
समाजासाठी आवश्यक असणार्‍या, समाजाला संघटित करणार्‍या, ठेवणार्‍या सर्व गोष्टींबाबत संघ विशेष प्रयत्नशील असतो. मग तो विषय धर्मजागरणाचा असो की, ग्रामीण विकास, गोसंवर्धनाचा अथवा परिवार प्रबोधनाचा असो. अशा प्रयत्नांना गतिविधी म्हटले जाते. त्यात सामाजिक समरसतेचाही अंतर्भाव आहे.
सामाजिक समरसतेच्या बाबतीत स्वयंसेवकांनी विविध प्रकारचे उपक्रम, समाजातील इतर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने घ्यावेत, अशी अपेक्षा असते. त्या दृष्टीने या जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. जिल्हास्तरापर्यंत असे कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
समरसता हा विषय केवळ अभियानाचा किंवा काही प्रासंगिक उपक्रमांचाच नाही, तर तो समाजाच्या आचरणातून प्रकट करण्याचा आहे आणि त्यामुळे संघ स्थापनेपासूनच संघाच्या सर्व कार्यक्रमांतून समरसता विषयाला प्राधान्य मिळाले आहे. स्व. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे प्रयत्न अधोरेखित करण्याचा संघाचा प्रयत्न असेल.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26186

Posted by on 3:24 pm. Filed under ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय, सांस्कृतिक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google