richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सायना नेहवालची चेन्नई पूरगस्तांना मदत

सायना नेहवालची चेन्नई पूरगस्तांना मदत

Saina-Nehwalहैद्राबाद, [४ डिसेंबर] – गेल्या चार दिवसांपासून चेन्नईत मुसळधार पावसाने थैमान मांडले आहे. पावसाच्या पाण्यामुळे अख्खी चैन्नई पाण्याखाली गेली असून येथील लोकांसाठी अनेकांनी मदतीचा हात दिला आहे. त्यात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालचाही समावेश आहे. सायना पूरग्रस्तांसाठी दोन लाख रूपयांची मदत करणार असल्याचे सायनाचे वडिल हरवीरसिंग यांनी सांगितले आहे.
पावसामुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सगळीकडे पाणी साचल्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणेही कठीण झाले आहे. त्यातून सावरण्यासाठी चेन्नईवासियांना मदतीचे हजारो हात पुढे आले आहेत. त्यात सायनानेही आपले योगदान दिले आहे. इतरांप्रमाणेच आपणही पूरग्रस्तांना मदत करायची अशी इच्छा तिने आपल्या वडिलांजवळ बोलून दाखवली. सायनाचे वडिल हारवीर सिंग तिची ही इच्छा पूर्ण करणार आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26003

Posted by on 3:28 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google