richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य » सार्वजनिक बँकांकडून कर्जाबाबत फसवणुकीचे दावे

सार्वजनिक बँकांकडून कर्जाबाबत फसवणुकीचे दावे

=आरबीआयने दिले चौकशीचे आदेश=
RBI GATEमुंबई, [११ मार्च] – शेतकरी आणि कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात आले असल्याचा दावा करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी केलेल्या अनियमिततेच्या चौकशीचे आदेश भारतीय रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.
राज्य सरकारच्या अखत्यारीतील वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने बँकांनी केलेल्या आर्थिक अनियमितेचे कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला आहे. मिशनकडून प्राप्त झालेले पुरावे अर्थमंत्रालयाने आरबीआयच्या मुख्य दक्षता अधिकार्‍याकडे सोपविले. त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर आरबीआयने तपासाचे आदेश दिले आहेत. राज्यमंत्रिपदाचा दर्जा प्राप्त असलेले मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी याबाबतची माहिती दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने शेतकरी व कृषी क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी योजना निर्धारित केली असतानाही, तिची अंमलबजावणी करण्यात बँकांना अपयश आले. गेल्या एका दशकात महाराष्ट्रातील २५ हजारावर शेतकर्‍यांसह देशभरातील लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असताना, बँकांनी मात्र त्यांची निव्वळ फसवणूक केली, असा आरोप तिवारी यांनी केला.
आरबीआयने देशातील सर्वच बँकांना कर्जाबाबतचे उद्दिष्ट निर्धारित करून दिले होते. पण, हे उद्दिष्ट पूर्ण न करताही, आम्ही ते गाठले असल्याचा दावा करण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता केली. यामुळे शेतकरी व कृषी क्षेत्राला लाभ पोहोचविण्याचे मुख्य उद्दिष्टच अपूर्ण राहिले, याकडेही तिवारी यांनी लक्ष वेधले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=27246

Posted by on 5:49 am. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, वाणिज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google