richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सिलिकॉन व्हॅलीसाठी एअर इंडियाची थेट सेवा

सिलिकॉन व्हॅलीसाठी एअर इंडियाची थेट सेवा

air-indiaसॅनफ्रॅन्सिस्को, [३ डिसेंबर] – एअर इंडिया या सार्वजनिक विमान वाहतूक कंपनीने असंख्य अनिवासी भारतीयांचे वास्तव्य असलेल्या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीसाठी नवी दिल्ली येथून थेट विमानसेवा सुरू केली असून, पहिले थेट विमान सॅनफ्रॅन्सिस्को येथे उतरल्यानंतर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
एअर इंडियाचे बी७७७-२०० एलआर जातीचे विमान (क्रमांक १७३) २३० प्रवाशांसह बुधवारी पहाटे ५.४० वाजता अवकाशात झेपावलेे. थेट विमान उतरत असताना विमानतळ वाहतूक नियंत्रण कक्षाचे टॉवर भारताच्या तिरंगी झेंड्याच्या रंगात रंगविण्यात आले होते. विमान धावपट्टीवर उतरताच प्रवाशांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या नव्या विमानसेवेचा शुभारंभ करण्यासाठी विमानतळावर आयोजित कार्यक्रमात कौन्सुलेट जनरल ऑफ इंडिया व्यंकटेशन् अशोक यांच्यासह भारत आणि अमेरिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एवढेच नव्हे तर शहराच्या महापौरांनी हा ‘एअर इंडिया डे’ म्हणून घोषित केला होता.
नवी दिल्ली येथून सॅनफ्रॅन्सिस्कोसाठी थेट विमानसेवा सुरू करणारी एअर इंडिया ही पहिलीच कंपनी असून, यामुळे अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीशी थेट संपर्क झाला आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=25960

Posted by on 11:18 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google