Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सुरक्षा परिषदेचा विस्तार करा

सुरक्षा परिषदेचा विस्तार करा

=जी-४ राष्ट्रांची मागणी=
unoसंयुक्त राष्ट्रसंघ, [३ मे] – संंयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा आराखडा आता कालबाह्य झाला असल्याचे भारतासह जी-४ च्या इतर सदस्य राष्ट्रांनी स्पष्ट केले असून, या शक्तिशाली जागतिक संस्थेच्या सुधारणा कार्यक्रमात अस्थायी सदस्यांना सामील करून घेतल्याशिवाय यामध्ये निर्माण झालेला असमतोल दूर होणार नाही असे म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेचा विस्तार करताना स्थायी गटात बदल केल्यास ते लोकशाही तत्त्वाच्या विरुद्ध होईल, हा युक्तिवाद आम्ही ऐकला. परंतु, आमच्या मते स्थायी सदस्यांच्या संख्येत वाढ करूनच विस्तार करण्यासह सुरक्षा परिषदेला लोकशाहीवादी, कायदेशीर, प्रातिनिधिक, प्रतिक्रियाशील आणि प्रभावशाली बनविता येईल, असे युनोतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सईद अकबरुद्दिन यांनी सोमवारी जी-४ राष्ट्रांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट केले.
सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या आराखड्यात समकालीन वास्तवाचे प्रतिबिंब उमटत नाही आणि त्यामुळे त्याचा हेतूही साध्य होत नाही, यावरही अकबरुद्दिन यांनी भर दिला. केवळ अस्थायी सदस्य गटाचा विस्तार करून समस्या सोडविता येणार नाही. सुरक्षा परिषदेचा आराखडा आणि रचना कालबाह्य झाली आहे, हे त्याचे मुख्य कारण आहे. वर्तमानकाळाचे वास्तव आणि भौगोलिक, राजकीय व आर्थिक बदलांचे प्रतिनिधित्व त्यामध्ये उमटत नाही, असेही अकरुद्दिन म्हणाले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28150

Posted by on May 4 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (386 of 2455 articles)


नवी दिल्ली, [३ मे] - भारतीय बँकांचे ९४०० कोटी रुपये बुुडवून परदेशात पळून गेलेले उद्योगपती विजय माल्या यांचे राज्यसभा सदस्यत्व ...

×