richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » सुरेश प्रभू देवासारखे धावले

सुरेश प्रभू देवासारखे धावले

=धावत्या रेल्वेत बालकाच्या दुधाची सोय=
suresh-prabhuकानपूर, [११ डिसेंबर] – रेल्वे प्रवासादरम्यान दुधासारखी जीवनावश्यक वस्तू सहजगत्या उपलब्ध न झाल्याने अनेक बालकांचे हाल होतात. लांब अंतरावरील प्रवासात तर कित्येकदा रेल्वे स्थानकांवरही दूध सहजासहजी मिळत नाही त्यामुळे चिमुकले अक्षरशः रडकुंडीस येतात.
ही अडचण लक्षात घेऊन समजा खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला तर? विश्‍वास बसत नसला तरीही गुरुवारी अशाच एका घटनेचे साक्षीदार ठरले सत्येंद्र यादव. त्यांच्या मदतीला रेल्वेमंत्र्यांच्या रूपात साक्षात प्रभूच धावून आले.
माण्डुवाडीह (वाराणसी)- नवी दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेसमधून यादव आपल्या कुटुंबासह प्रवास करत होते. मात्र, दाट धुक्यामुळे रेल्वेला प्रचंड उशीर होत होता. अशातच यादव यांचा पाच वर्षांचा मुलगा अविश, दुधासाठी रडू लागला. मात्र, त्यांना कुठेही दूध मिळेना. अखेरीस काही न सुचल्याने त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मेन्शन करत एका ट्विटद्वारे आपली अडचण कळवली. प्रभू यांनी काही क्षणातच ट्विटला प्रतिसाद यादव यांचा मोबाईल नंबर विचारला. त्यांची गाडी नेमकी कोणत्या स्थानकाजवळ आहे याची माहिती घेऊन संंबंधित प्रशासनाला कळवत अवघ्या १० मिनिटांतच चिमुकल्यासाठी दुधाची व्यवस्था करून दिली. इलाहाबाद येथून गाडी जात असताना रेल्वे प्रबंधकांना सत्येंद्र यांची अडचण सांगत त्याबाबत सोय करण्याचे आदेश दिले. कानपूर स्थानकावर रेल्वे थांबल्यावर तिथे चक्के रेल्वेचे संबंधित अधिकारी लहानग्यासाठी दूध व बिस्किट घेऊन हजर होते, अशी माहिती उत्तर-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित मालवीय यांनी दिली. तसेच फतेहपूर स्थानकावर रेल्वे पोचताच स्टेशन मास्तरने यादव कुटुंबियांना काही खाद्यपदार्थही देऊ केल्याचे मालवीय यांनी सांगितले.
तातडीने मिळालेल्या या मदतीमुळे भारावून जात यादव व त्यांची पत्नी कुसुम यांनी प्रभू यांचे मनापासून आभार मानले. माझ्या मुलाला दूध मिळालं आहे, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तुमचे खूप खूप आभार… अशा भावना देखील त्यांनी ट्विटरवर व्यक्त केल्या.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26126

Posted by on 2:53 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google