Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सुवर्णरोखे योजनेला वाढता प्रतिसाद

सुवर्णरोखे योजनेला वाढता प्रतिसाद

=९१७ किलो सोन्याची खरेदी=
SUVARNA ROKHE YOJNAनवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] – केंद्र सरकारच्या सुवर्णरोखे योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. सुरवातीला या योजनेला थंड प्रतिसाद मिळाला असला तरी आता गुंतवणूकदार या योजनेकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव शक्तिकांता दास यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
सुवर्णरोखे खरेदी करण्यासाठी ६३ हजारांच्या आसपास अर्ज जमा झाले असून, यातून ९१७ किलो सोन्याची खरेदी करण्यात येणार आहे. सोने खरेदीला अतिरिक्त पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ५ ते २० नोव्हेंबर दरम्यान सुवर्णरोख्यांची विक्री करण्यात आली. या कालावधीत अर्ज करणार्‍यांना ३० नोव्हेंबर रोजी रोख्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याआधी यासाठी २६ नोव्हेंबर ही तारीख निश्‍चित करण्यात आली होती. पण, आरबीआयने नंतर ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली. योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने सुरवातीच्या दिवसात योजनेस अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळाला नाही. आता मात्र यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. बँका आणि टपाल खात्यातून यासाठी अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. देशाच्या विकासात उपयोग व्हावा आणि गुंतवणूकदारांना व्याज प्राप्त व्हावे, या हेतूने केंद्र सरकारने ही योजना सादर केली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25807

Posted by on Nov 29 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (1128 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२८ नोव्हेंबर] - दिल्लीतील आमदारांची वेतनवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावास शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी ...

×