Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » सेऊलमध्ये एनएसजीची बैठक सुरू

सेऊलमध्ये एनएसजीची बैठक सुरू

=भारताला पाठिंबा द्या: अमेरिकेचे सदस्य देशांना आवाहन=
NSG-Nuclear-Suppliers-Groupवॉशिंग्टन, [२१ जून] – अणुपुरवठादार राष्ट्रसमूहाची (एनएसजी) वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी रात्रीपासून दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे सुरू झाली आहे. एनएसजीमध्ये भारताच्या प्रवेशाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी या देशाच्या उमेदवारीला सर्व सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
एनएसजीचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे पात्र आहे आणि भारताला सदस्यत्व प्रदान करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यामुळे इतर सदस्य राष्ट्रांनीही भारताचे समर्थन करावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत, असे व्हाईट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जोस अर्नेस्ट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आम्ही केवळ भारताचे समर्थन करीत आहोत. कारण, हा देश या गटात प्रवेश करण्यासाठी सक्षम आहे. इतर कोणत्याही देशाला जर या गटात सहभागी करून घ्यायचे असेल, तर सदस्य राष्ट्रांमध्ये मतैक्य घडून येणे आवश्यक आहे, अशी स्पष्ट भूमिकाही अमेरिकेने घेतली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही याच महिन्याच्या सुरुवातीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या मुद्यावर चर्चा करून भारताला समर्थन देण्याची ठोस ग्वाही दिली होती. भारत या गटाचा सदस्य व्हावा, असे अमेरिकेसोबतच अनेक देशांना मनापासून वाटते, याकडेही अर्नेस्ट यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, अन्य एका पत्रपरिषदेत अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किरबे यांनीही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या काळात बराक ओबामा यांनी भारताच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले होते, याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे. या गटातील सर्व सदस्यांनीही भारताला पाठिंबा द्यावा, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करणार आहोत, असे ते म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28694

Posted by on Jun 22 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (207 of 2458 articles)


=पाकिस्तानसाठी चीनचा असाही आटापिटा= बीजिंग, [२१ जून] - अणुपुरवठादार देशांच्या गटात (एनएसजी) भारताला सदस्यत्व मिळायला नको, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत ...

×