richwood
richwood
richwood
Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका

सोनिया, राहुल गांधींना न्यायालयाचा झटका

=नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया, राहुल गांधी विनंती याचिका फेटाळली, आज कोर्टात व्यक्तिश: हजेरी=
soniaGandhi_rahulGandhiनवी दिल्ली, [७ डिसेंबर] – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने बजावलेला समन्स रद्द करण्यात यावा, अशी कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांची विनंती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज सोमवारी फेटाळून लावली. गांधी घराण्याला हा मोठा धक्काच असून, यामुळे सोनिया आणि राहुल गांधी यांना उद्या मंगळवारी व्यक्तिश: कनिष्ठ न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय कॉंगे्रसने घेतला आहे.
ही याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत, तसेच कनिष्ठ न्यायालयात व्यक्तिश: उपस्थितीतून सूट मिळण्याची दुसरी विनंतीही नामंजूर करण्यात येत आहे, असे न्या. सुनील गौड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले.
कनिष्ठ न्यायालयाने गेल्या वर्षी ६ ऑगस्ट रोजी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात व्यक्तिगत उपस्थितीचा समन्स जारी केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. आम्हाला एक तर व्यक्तिगत उपस्थितीतून सूट देण्यात यावी, किंवा समन्सवरील स्थगिती पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती गांधी परिवारातर्फे करण्यात आली होती. पण, न्या. गौड यांनी दोन्ही विनंत्या अमान्य केल्या.
नॅशनल हेरॉल्डशी संलग्न असलेल्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडला व्याजमुक्त कर्ज देण्याच्या आवश्यकतेवरही न्यायालयाने यावेळी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. व्याजमुक्त कर्ज देण्याची गरजच काय होती, असा सवाल न्यायालयाने केला. या प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबतच, सुमन दुबे, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया लिमिटेड कंपनीलाही उद्या मंगळवारी न्यायालयात व्यक्तिश: हजर व्हायचे आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26042

Posted by on 2:30 pm. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google