Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » स्मृती इराणींचे अल्वींना सडेतोड प्रत्युत्तर

स्मृती इराणींचे अल्वींना सडेतोड प्रत्युत्तर

=पंतप्रधानांना म्हटले होते स्टुपिड=

New Delhi: HRD Minister Smriti Iranii and husband Zubin Irani during Padma Awards 2015 function at Rashtrapati Bhavan in New Delhi on Wednesday. PTI Photo by Subhav Shukla (PTI4_8_2015_000143A)

नवी दिल्ली, [१७ मे] – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीद अल्वी यांनी गुगल सर्चमध्ये मोदी स्टुपिड नावाने सर्च होत असल्याचे एका कार्यक्रमात सांगितले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या स्मृती इराणी चांगल्याच भडकल्या व त्यांनी अल्वी यांना चांगलेच सुनावले.
येथे झालेल्या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात अल्वी यांनी स्मृती इराणी यांना, गुगल सर्चमध्ये मोदींना स्टुपिड पीएम म्हटले जाते, सरकारने त्यावर काय केले, असा प्रश्‍न विचारला. मात्र, इराणी यांनी उत्तर देण्याआधी प्रेक्षकांमधूनच अल्वी यांच्या विरोधात शेम-शेमच्या घोषणा देण्यात आल्या व माफी मागण्याची मागणीही करण्यात आली.
अल्वी यांच्यानंतर स्मृती इराणी यांनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, कॉंग्रेसमधील जे लोक मोदींना शिव्या देतात किंवा त्यांच्याविरोधात बोलतात, त्यांना त्यांच्या पक्षात फार महत्त्व दिले जाते. येथे उपस्थित सर्वच लोक भाजपा समर्थक वा विरोधक नाहीत. मात्र, त्यापैकी कोणालाही अल्वींचे वक्तव्य आवडलेले नाही.
इराणी पुढे म्हणाल्या, अल्वी जर देशाच्या पंतप्रधानपदावरील व्यक्तीबद्दल असे म्हणत असतील तर त्यांच्याकडून महिलांच्या सन्मानाची अपेक्षा कशी करता येईल. आताच रशीद अल्वी म्हणाले की, मी मोदींच्या फार जवळची आहे. मला हे विषाचे घोट रोज प्यावे लागत आहेत. त्यानंतरही तुम्ही म्हणता की स्मृतीला एवढा राग का येतो. इराणी यांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे कार्यक्रमातील वातावरण एकदमच बदलून गेले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28297

Posted by on May 17 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (332 of 2453 articles)


=फॉरेन्सिक लॅबचा अहवाल= नवी दिल्ली, [१७ मे] - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या ९ फेबु्रवारी रोजी दहशतवादी अफजल ...

×