richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » स्मृती इराणींना संबोधले मोदींची दुसरी पत्नी

स्मृती इराणींना संबोधले मोदींची दुसरी पत्नी

=कॉंगे्रसने ओलांडली टीकेची खालची पातळी=

गुवाहाटी, [२८ डिसेंबर] – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहिणीसारख्या आहेत आणि प्रत्येक रक्षाबंधनाला त्या मोदी यांना राखी बांधतात, हे सत्य संपूर्ण जगाला माहीत असतानाही, केंद्रातील सत्तेतून बाहेर फेकल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या कॉंगे्रस पक्षाने मोदी यांच्यावर टीका करताना आता चक्क सर्वांत खालची पातळी गाठली आहे. स्मृती इराणी यांच्याकडे लोक मोदी यांची दुसरी पत्नी म्हणूनच पाहतात, असे वादग्रस्त वक्तव्य कॉंगे्रसचे आसामातील नेते नीलमणी सेन डेका यांनी केले. यामुळे देशाच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आसामच्या नालबेरी येथे आयोजित एका सभेत डेका यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना माणुसकीच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या. डेका यांच्यासोबतच कॉंग्रेसचे एक आमदार रूप ज्योती कुर्मी यांनीही मोदी यांच्याविषयी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कॉंग्रेस नेत्यांच्या या वक्तव्यांचा भाजपाने तीव्र निषेध नोंदविला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री सरबानंदा सोनोवाल यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या प्रकरणी नरेंद्र मोदी यांची जाहीरपणे माफी मागावी. सोबतच आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही या नेत्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कॉंग्रेसने मात्र नेहमीप्रमाणेच या नेत्यांचे ते वैयक्तिक मत असल्याचे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26292

Posted by on 10:10 pm. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google