Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल सोडण्याची तयारी

स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल सोडण्याची तयारी

=इस्रो घेणार ऐतिहासिक झेप=
isro logoतिरुवनंतपुरम्, [१५ मे] – आतापर्यंत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या तयारीत असून, याच महिन्यात इस्रोचे स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल अंतराळात झेपावण्याची दाट शक्यता आहे.
संपूर्ण स्वदेशी बनावटीचे स्पेस शटल अंतराळात सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एखाद्या स्पोटर्‌‌स युटिलिटी व्हेईकलचे (एसयुव्ही) वजन आणि आकाराचे पंख असलेल्या शटलला आज रविवारीच अंतिम रूप देण्यात आले असून, आता श्रीहरिकोटा येथे या स्पेस शटलची अंतिम उलटगणती सुरू होण्याची वाट आहे.
हा प्रयोग यशस्वी होऊन तंत्रज्ञानाचा फेरवापर शक्य झाल्यास अंतराळात सामग्री सोडण्याचा खर्च किमान दहा पटीने कमी होणार आहे. त्यानंतर हा खर्च दोन हजार डॉलर्स प्रतीकिलो इतका येईल, असा इस्रोच्या शास्त्रज्ञांचा दावा आहे. सर्वकाही व्यवस्थित झाल्यास मान्सूनच्या आगमनापूर्वीच आंध्रप्रदेशातील बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर असलेल्या श्रीहरिकोटा येथून स्वदेशी बनावटीचे रीयुजेबल लॉन्च व्हेईकल – टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर (आरएलव्ही – टीडी) अवकाशात झेपावेल. डेल्टा विंग्ज असलेले स्पेस शटल अवकाशात सोडण्याची इस्रोची ही पहिलीच वेळ असणार आहे.
मात्र, या प्रयोगात आरएलव्ही-टीडी समुद्रातून पुन्हा हस्तगत केले जाण्याची फारशी शक्यता नाही. हे वाहन तरंगणारे नसल्याने पाण्यावर पडल्यानंतर ते विखुरले जाईल, असा अंदाज आहे. दिसायला अमेरिकन स्पेस शटलसारखेच असलेले आरएलव्ही-टीडी हे प्रयोगासाठी तयार करण्यात आले असून, अंतिम नमुन्यापेक्षा ते ६ पटीने लहान आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28250

Posted by on May 16 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (346 of 2450 articles)


=कॉंग्रेसची मागणी= नवी दिल्ली, [१५ मे] - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या नव्या आरोपपत्रामुळे ...

×