Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » स्वामीप्रसाद मौर्य यांचा भाजपात प्रवेश

स्वामीप्रसाद मौर्य यांचा भाजपात प्रवेश

swami-prasad-mauryaनवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – बसपाचे माजी महासचिव स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मौर्य यांच्या प्रवेशामुळे भाजपात उत्साह संचारला आहे, तर बसपाला मोठा हादरा बसला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी आज ११ अशोका रोड या भाजपा मुख्यालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, उत्तरप्रदेश भाजपाचे प्रभारी खा. ओमप्रकाश माथूर आणि उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष खा. केशवप्रसाद मौर्य यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
पदरौना येथून आमदार असलेले स्वामीप्रसाद मौर्य उत्तरप्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. या पदावर असतांनाच त्यांनी मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढवत दलितांचा विश्‍वासघात करण्यासोबत तिकीट विकण्याचा आरोप केला होता. बसपाचा राजीनामा दिल्यानंतर मौर्य समाजवादी पार्टीत जातील अशी चर्चा होती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी त्यांची चर्चाही झाली होती. विशेष म्हणजे मौर्य यांनी बसपाचा राजीनामा दिल्यानंतरही मायावती यांनी त्यांची पक्षातून हकालपट्ठी केली होती. मौर्य यांच्या जाण्यामुळे बसपाचे काही नुकसान होणार नाही, मौर्य स्वार्थी आणि गद्दार असल्याचा आरोपही मायावती यांनी केला होता.
बसपाचा राजीनामा दिल्यानंतर मौर्य यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा बोलवत पुढील राजकीय वाटचालीबाबत त्यांचा सल्ला घेतला होता. मौर्य भाजपात प्रवेश करतील, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चाही होती, ती आज खरी ठरली. मौर्य यांनी आज शिवपूरचे आमदार उदयलाल आणि अन्य अनेक समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी मौर्य यांचे भाजपात स्वागत केले. स्वामीप्रसाद मौर्य यांच्या प्रवेशामुळे भाजपाला पूर्वांचलमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. पूर्वांचलात मौर्य आणि कुशवाह समुदायात स्वामीप्रसाद मौर्य यांची चांगली पकड आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29170

Posted by on Aug 9 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य (134 of 2452 articles)


 ‘माय गव्हर्नमेंट डॉट इन’चा दुसरा वर्धापन दिन थाटात  ‘टाऊन हॉल’ कार्यक्रमाचा शुभारंभ नवी दिल्ली, [६ ऑगस्ट] - गोरक्षा ही ...

×