Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » हवाई दलातही पाकचा हेर

हवाई दलातही पाकचा हेर

=बडतर्फ अधिकार्‍याला अटक=
pakistani-terrorist-isiनवी दिल्ली, [२९ डिसेंबर] – लष्करासोबतच भारतीय हवाई दलातही असलेले पाकिस्तानच्या आयएसआयचे जाळे मोडित काढताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी हवाई दलातील बडतर्फ अधिकार्‍याला हेरगिरीप्रकरणी अटक केली.
रंजित असे या बडतर्फ अधिकार्‍याचे नाव असून, तो हवाई दलाच्या भाटिंडा केंद्रात कार्यरत होता. हवाई दलाशी संबंधित दस्तावेज आयएसआयला देण्याच्या आरोपाखाली त्याला अलीकडेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्याला केरळात अटक करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी दिल्लीत आणण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती प्राप्त करून तो ई-मेल किंवा अन्य सोशल नेटवर्किंग साईट्‌सच्या माध्यमातून आयएसआयला पाठवित होता. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली होती, अशी माहिती वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. दिल्ली पोलिसांनी गेल्या एक महिन्याच्या काळात लष्करातील सहा जणांना पाकसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात अटक केली आहे. आता हवाई दलातील माजी अधिकारी जेरबंद झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26318

Posted by on Dec 29 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (971 of 2453 articles)


=प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल= नवी दिल्ली, [२९ डिसेंबर] - भारतात मुस्लिमांच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचा अहवाल ताजा असतानाच, प्यू रिसर्च ...

×