richwood
richwood
richwood
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » हवामान बदल करारासाठी ओबामा-मोदी कटिबद्ध: व्हाईट हाऊस

हवामान बदल करारासाठी ओबामा-मोदी कटिबद्ध: व्हाईट हाऊस

=उभय नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा=
modi-obama1वॉशिंग्टन, [९ डिसेंबर] – संपूर्ण जगाला भेडसावणार्‍या हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी याच आठवड्यात सक्षम करार करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक दृष्ट्या कटिबद्ध आहेत, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे.
हवामान बदलांवर सध्या पॅरिस येथे सुरू असलेल्या कॉन्फरन्स ऑफ पॅरिस (सीओपी२१) बाबत बराक ओबामा यांनी पंतप्रधान मोदी यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॅलिफोर्निया येथे झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्यांबद्दल शोकसंवेदनाही व्यक्त केल्या.
दूरध्वनीवरून चर्चा करताना उभय नेत्यांनी याच आठवड्यात हवामान बदलांबाबत सक्षम करार करणे आणि या माध्यमातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले, असे व्हाईट हाऊसने उभय नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या संभाषणाबाबत माहिती देताना सांगितले. कॅलिफोर्नियाच्या सॅन बर्नार्डिनो येथे गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील मृतांप्रती पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलेल्या संवेदना अध्यक्ष ओबामा यांनी अमेरिकन जनतेच्या वतीने स्वीकारल्या, असेही व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले. ओबामा यांनी एक दिवस आधीच ब्राझीलच्या अध्यक्षांशी चर्चा केली होती.
हवामान बदलांबाबत सध्या पॅरिस येथे सुरू असलेल्या परिषदेत १८० पेक्षा जास्त देश सहभागी झाले असून, यासंबंधी करार करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर ओबामा यांची बारिक नजर आहे, असेही व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आले.
गेल्याच आठवड्यात हवामान बदलांवरील परिषदेच्या निमित्ताने ओबामा आणि मोदी यांच्यात पॅरिस येथे भेट झाली होती. याचवेळी ओबामा यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26061

Posted by on 7:32 pm. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google