richwood
richwood
richwood
Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » हाफिजने सुरू केला भारतविरोधी सायबर सेल

हाफिजने सुरू केला भारतविरोधी सायबर सेल

लाहोर, [२८ डिसेंबर] – २५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला आश्‍चर्यकारक भेट देऊन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली आणि शरीफांनीही मोदी यांचे भव्य स्वागत केले. यामुळे तीळपापड झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदने भारताविरोधात चोवीसही तास सक्रिय राहणारा सायबर सेल सुरू केला आहे.
गुप्तचर यंत्रणांनी याबाबतची माहिती दिली आहे. हाफिजने या सायबल सेलला जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचे नाव दिले असून, याच सेलच्या माध्यमातून भारतविरोधी कारवाया आणि हल्ल्यांची रूपरेषा तयार करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, २५ डिसेंबरला मोदी यांनी नवाज शरीफांच्या विनंतीला मान देऊन लाहोरला भेट दिली होती आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे २७ डिसेंबरला हा सायबर सेल सुरू करण्यात आला. भारतविरोधी कारवायांसाठी अतिरेक्यांची भरती करण्याकरिताही या सायबल सेलचा वापर करण्यात येणार असल्याचेही गुप्तचर सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, जमातचेच रूप असलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनेही एक महिन्यापूर्वी भारतविरोधी कारवायांसाठी एक मोबाईल ऍप सुरू केला होता. जम्मू-काश्मिरातील आपल्या अतिरेक्यांशी संपर्क साधण्यासाठी या ऍपचा वापर होत असल्याचे सूत्रांचे मत आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26296

Posted by on 10:12 pm. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google