richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » हिंसाचार सोडा, शांतता प्रक्रियेत सहभागी व्हा

हिंसाचार सोडा, शांतता प्रक्रियेत सहभागी व्हा

=राजनाथसिंह यांचे नक्षल्यांना आवाहन=
rajnath singh3बिलासपूर, [१८ जून] – हिंसाचाराचा मार्ग सोडा आणि शांतता चर्चेच्या प्रक्रियेत सहभागी व्हा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे केले. तुम्ही शस्त्र खाली ठेवले, तर तुमच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित ‘विकास पर्व’ रॅलीला संबोधित करताना राजनाथसिंह म्हणाले की, आपल्या संस्कृतीत हिंसाचाराला कुठेही स्थान नाही आणि या देशातील नागरिकांनाही हिंसाचार मान्य नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांनी बंदूक संस्कृतीचा त्याग करावा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी व्हावेे. त्यानंतर तुमच्या सर्व मागण्यांवर गंभीरपणे विचार केला जाईल.
हिंसाचार हाच विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडसर असल्याने तो थांबायलाच हवा. ज्यांना गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाची काळजी आहे, ते कधील निष्पाप नागरिकांची हत्या करीत नाही. तुमची विचारधारा वेगळी असू शकते, पण त्यातून तुम्ही सामान्यांची हत्या करणे नक्कीच योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरचाही उल्लेख केला. सुरक्षा दलांच्या निरंतर प्रयत्नांमुळे या राज्याच्या सीमेवरून होणारी अतिरेक्यांची घुसखोरी ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. आपल्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत. आधी अतिरेकी सहजपणे भारतात प्रवेश करायचे. आता ते शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.

Short URL: http://vrittabharati.in/?p=28644

Posted by on 3:07 pm. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google