richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » ‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाला वेगळे वळण, उद्या निर्णय

‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाला वेगळे वळण, उद्या निर्णय

salman bailमुंबई, [९ डिसेंबर] – बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘हिट ऍण्ड रन’ प्रकरणी आज बुधवारी उच्च न्यायालयात निकाल लिहिण्याची प्रक्रिया सुरू होती. आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायाधीश ए. आर. जोशी यांनी नोंदविलेल्या निरीक्षणामुळे या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. हिट ऍण्ड रन प्रकरणी सलमान खान याचा मृत अंगरक्षक व साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष न्यायालयात ग्राह्य धरणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणी सलमानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणी उद्या गुरूवारी निकाल येण्याची शक्यता आहे.
अपघाताच्यावेळी सलमान खान गाडी चालवत होता. अशी साक्ष रवींद्र पाटीलने दिली होती. मात्र न्यायालयाने रवींद्र पाटीलच्या साक्षीवर पूर्ण विश्‍वास ठेवता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच सत्र न्यायालयाने त्याची साक्ष ग्राह्य धरण्याची चूक केली, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे सलमानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
रवींद्र पाटील हे सलमानचे अंगरक्षक म्हणून अपघाताच्यावेळी सलमानसोबत त्याच अपघातग्रस्त कारमध्ये होते. मात्र, रवींद्र पाटील यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. पण मृत्यूआधी न्यायालयात त्यांनी सलमान खान अपघाताच्यावेळी दारू प्यायला होता अशी साक्ष नोंदवली होती. पण, आता त्यावर न्यायालयाने वेगळे निरीक्षण नोंदवले आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26055

Posted by on 7:21 pm. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google