richwood
richwood
richwood
Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » हिट ऍण्ड रन प्रकरणात सलमान खान निर्दोष

हिट ऍण्ड रन प्रकरणात सलमान खान निर्दोष

=मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार=
Salman-Khan_64मुंबई, [१० डिसेंबर] – देशभरात गाजलेल्या २००२ च्या हिट ऍण्ड रन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी बॉलीवूड अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता करून त्याला मोठा दिलासा दिला. याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आलेले अपील मान्य करण्यात येत आहे. याप्रकरणी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवून सलमान खानची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे, असे न्या. ए. आर. जोशी यांनी खचाखच भरलेल्या न्यायालयात आपला निर्णय देताना सांगितले. न्यायालयाचा निर्णय ऐकताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ४९ वर्षीय सलमानला आपले अश्रू आवरणे कठीण झाले.
न्यायालयाच्या आदेशानंतर सलमान बरोबर दीड वाजता न्यायालयात हजर झाला. यावेळी पोलिसांनी न्यायालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. सलमानसोबत त्याचा सुरक्षारक्षक शेरा, जावइर्ं आयुष, बहीण अल्विरा आणि व्यवस्थापक हजर होते. न्या. जोशी यांनी सोमवारपासून या प्रकरणाच्या निकाल वाचनास प्रारंभ केला होता आणि सलमानवरील आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आल्याचे त्यांनी निकालात स्पष्ट केले. आरोप सिद्ध करण्याची मुख्य जबाबदारी सरकारी पक्षाची असते आणि यामध्ये कोणताही संशय उरणार नाही असे सबळ पुरावे सादर करावे लागतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. अशाप्रकारच्या पुराव्यांच्या आधारे सलमानला दोषी ठरविता येणार नाही, असेही न्या. जोशी यांनी स्पष्ट केले.
२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान खानच्या वाहनाने वांद्रे येथील एका बेकरी दुकानासमोर रस्त्यावर झोपलेल्यांना उडवले होते. या घटनेत एक जण ठार आणि चार जण जखमी झाले होते.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26124

Posted by on 4:09 pm. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google