Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » हिलरी क्लिटंनचा धर्म कोणता?

हिलरी क्लिटंनचा धर्म कोणता?

=ट्रम्प यांचा सवाल=
hillary-and-trumpवॉशिंग्टन, [२२ जून] – अमेरिकन अध्यक्षपदासाठी प्राथमिक फेर्‍या आतापर्यंत रंगतदार ठरल्या असतानाच, ही निवडणूक आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेमॉक्रॅटिक पार्टीच्या पहिल्या महिला उमेदवार हिलरी क्लिटंन यांचा धर्म कोणता, असा सवाल उपस्थित केला आहे.
हिलरी क्लिटंन यांनी आतापर्यंत अनेकदा ख्रिश्‍चन धर्मावर आपली श्रद्धा असल्याचे स्पष्ट केले आहे. क्लिटंन अनेक वर्षांपासून सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असल्या, तरी त्यांच्या धार्मिक आयुष्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, असे सांगत ट्रम्प यांनी त्यांच्या धर्माबाबत शंका उपस्थित केली. ते धार्मिक गटाच्या नेत्यांशी चर्चा करीत होते. या चर्चेचे चित्रीकरण सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहे.
हिलरी क्लिटंन यांच्या धार्मिकतेबाबत कुणालाही काहीच माहीत नाही. राष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांची उमेदवारी म्हणजे बराक ओबामा यांना मुदतवाढ देण्यासारखे आहे. ही स्थिती अतिशय वाईट असेल. कारण, ओबामा यांच्या काळात तुम्हाला संरक्षण होते. हिलरी यांची सत्ता आल्यास हे संरक्षण राहाणार नाही, असे मत त्यांनी मांडले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28717

Posted by on Jun 23 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (202 of 2458 articles)


=युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही?= लंडन, [२२ जून] - ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये रहावे की नाही, या मुद्यावर उद्या गुरुवारी ब्रिटनमध्ये ...

×