Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ॐ च्या उच्चाराने धर्म बदलत नाही : रामदेव बाबा

ॐ च्या उच्चाराने धर्म बदलत नाही : रामदेव बाबा

India Politicsनवी दिल्ली, [२० जून] – योग करताना ‘ॐ’ असा उच्चार केल्याने कोणाचाही धर्म बदलणार नाही. ओम धर्मनिरपेक्ष आणि वैश्‍विक स्तरावर आहे. त्यामुळे योग करणार्‍या सर्वजणांनी ॐ चा उच्चार करावा, असा सल्ला योग गुरू रामदेव बाबा यांनी दिला.
येथील राजपथवर आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमात रामदेव बाबा बोलत होते.
ते पुढे म्हणाले, दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या योग शिबिरात सहभागी झालो होतो. तेथे ओम किंवा आमेन म्हणण्याची सुविधा देण्यात आली होती. त्यावेळी मुस्लिमबांधवांनी ओमचा उच्चार व सूर्यनमस्कार केले. पण यामुळे लगेच त्यांचा धर्म बदलला नाही. योग करणे हे धार्मिक नसून, सर्वच मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याने सर्वच धर्मातील लोकांनी योग केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28661

Posted by on Jun 21 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (213 of 2453 articles)


=योगी आदित्यनाथ यांचा आरोप= बस्ती, [२० जून] - भारताचे ख्रिश्तीकरण करण्याचे आजवर जे प्रयत्न झाले आणि जे कट रचण्यात आले, ...

×