Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » १५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : किशोरचंद्र देव

१५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा : किशोरचंद्र देव

=कॉंग्रेसमध्ये घमासान=
kishore chandra deoनवी दिल्ली, [२२ मे] – पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस पक्षात निर्माण झालेल्या बेचैनीसह मोठे बदल करण्याची मागणी जोर धरत असतानाच, काही वरिष्ठ नेते पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची दिशभूल करीत असल्याने १५-२० नेत्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री किशोरचंद्र देव यांनी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली.
मोदी सरकार आता नव्हे तर २०१९ मध्ये जाणार हे निश्‍चित असल्याचा दावा देव यांनी केला असून, कॉंग्रेसने यासाठी आतापासूनच कंबर कसली नाही तर अनेक राज्यांमध्ये लहान-लहान प्रादेशिक पक्ष निर्माण होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासाठी देव यांनी दिल्लीचे उदाहरण दिले. ज्याठिकाणी आपचा अचानक उदय झाला आणि तो पक्ष सत्तासिंहासनावर जाऊन बसला, असे देव यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सांगितले.
पक्षाने आतापर्यंत खूप आत्मचिंतन केले असून, आता त्या दिशेने पावले उचलण्याची गरज आहे. संघटनेत राहून एआयसीसी प्रमुख व्हायचे असेल, प्रदेश कॉंग्रेस प्रमुख व्हायचे असेल किंवा मग पक्ष सत्तेत आल्यानंतर केंद्रीय मंत्री व्हायचे असेल तर संगीत खुर्चीचा खेळ करणार्‍या १५-२० नेत्यांना काही वर्षांसाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्याची गरज आहे, या शब्दांत देव यांनी हल्ला चढविला. सोनिया असो वा राहुल गांधी, नेतृत्वाला जर चुकीची माहिती मिळत असेल तर आपण कोणत्या परिणामांची अपेक्षा करू शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28407

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (297 of 2453 articles)


=घुसखोरी रोखण्याचा सोनोवाल यांचा निर्धार= गुवाहाटी, [२१ मे] - बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी कायमची रोखण्याचा निर्धार व्यक्त करताना, बांगलादेशसोबतच्या सर्व सीमा ...

×