richwood
richwood
richwood
Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » १८ करबुडव्यांची यादी आयकर विभागाकडून जाहीर

१८ करबुडव्यांची यादी आयकर विभागाकडून जाहीर

income_tax_logoनवी दिल्ली, [३० डिसेंबर] – आयकर विभागाने आज बुधवारी आणखी १८ करबुडव्यांची नवी यादी जाहीर केली. यात सोने व हिरे व्यापार्‍यांचा समावेश असून, या सर्व लोकांनी गेल्या अनेक आढावा वर्षांच्या काळात सरकारचा ११०० कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे.
आयकर विभागाने ही यादी तयार केली असून, केंद्रीय अर्थमंत्रालयाने ती देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित केली आहे. यात या करबुडव्यांचे नाव, त्यांच्या उद्योगांची नावे, पत्ता आणि त्यांच्याकडे असलेल्या कराची थकबाकी इत्यादी माहितीचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी कोणत्या वर्षापासून कर भरला नाही, याचाही यात उल्लेख आहे.
या यादीत मुंबईतील उदय एम. आचार्य, त्यांचा वारसदार अमुल आचार्य आणि भावना आचार्य यांच्या नावावर सर्वाधिक ७७९.०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. उदय आचार्य आता जिवंत नाहीत. आयकर विभागाने करबुडव्यांची प्रसिद्ध केलेली ही तिसरी यादी आहे. करबुडव्यांचे नाव जाहीर करून समाजात त्यांना लाजिरवाणे करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग म्हणून आयकर विभागाने हा पुढाकार घेतला आहे.
अहमदाबाद येथील जग हीत एक्सपोर्ट्‌स प्रा. लि. कडे १८.४५ कोटी, जसुभाई ज्वेलर्सकडे ३२.१३, कल्याण ज्वेलर्सकडे १६.७७, लिव्हरपूल रिटेल इंडियाकडे ३२.१६, धर्नेंद्र ओव्हरसील लिमिटेडकडे १९.८७ आणि प्रफुल्ल अखानी यांच्याकडे २९.११ कोटी रुपये, याशिवाय हैदराबादेतील मॅक्सऑफ्ट इन्फोटेल लिमिटेडकडे ६८.२१ कोटी आणि भोपाळ येथील ग्रेट मेटल्स प्रा. लि.कडे १३.०१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

Short URL: http://vrittabharati.in/?p=26329

Posted by on 10:44 pm. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google