|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.45° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 65 %

वायू वेग : 3.63 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.64°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » २०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०५० अखेरीस भारत जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

=तरुणांची संख्या राहणार सर्वाधिक
=अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अंदाज, 
वृत्तसंस्था
न्यूयॉर्क, २ मार्च –
भारतातील वाढत्या मुस्लिम लोकसंख्येवर एकीकडे चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे जगात सर्वाधिक मुस्लिम व्यक्ती भारतात राहतील, असे संकेत देणारा अहवाल  सध्या विशेष चर्चेचा विषय बनला आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज प्यू रिचर्स सेंटरने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्‍चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. २०१० पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या १.६ अब्ज इतकी होती. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या २३ टक्के इतके होते.
मुस्लिम धर्मीयांच्या वाढीचा सध्याचा वेग कायम राहिल्यास २१ व्या शतकाच्या अखेरीस मुस्लीम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल. सध्या सुरू असलेले शतक संपेपर्यंत मुस्लीम धर्माने अनुयायांच्या संख्येच्या बाबतीत ख्रिश्‍चन धर्माला मागे टाकलेले असेल, असा अंदाज प्यू रिसर्च सेंटरने वर्तवला आहे. सध्याच्या घडीला इंडोनेशियातील मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, २०५० च्या अखेरपर्यंत मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पहिला असेल. २०५० वर्ष संपताना भारतात तब्बल ३० कोटी मुस्लिम असतील. सध्या सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.
२०५० सालाच्या अखेरपर्यंत युरोपातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत १० टक्के वाढ झालेली असेल. तर अमेरिकेतील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण २०५० च्या अखेरीस एकूण लोकसंख्येच्या २.१ टक्के असेल. सध्या अमेरिकेतील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण एक टक्का इतके आहे.
मुस्लिम धर्मीयांची संख्या वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे अहवालात नमूद केले आहे. सर्वाधिक जन्मदर हे मुस्लिम धर्माच्या वाढीचे पहिले कारण आहे. मुस्लिम धर्मीयांचा जन्मदर इतरांच्या तुलनेत जास्त आहे. जागतिक स्तरावरील सरासरी लक्षात घेता प्रत्येक मुस्लिम महिलेला साधारणत: ३.१ मुले असतात. इतर धर्मीतील महिलांचा विचार केल्यास ही सरासरी २.३ इतकी आहे. तरुणांची सर्वाधिक असलेली संख्या हे मुस्लिमांचे प्रमाण वाढण्याचे दुसरे कारण आहे. २०१०  मध्ये मुस्लिम लोकसंख्येचे सरासरी वयोमान २३ वर्षे  इतके होते. त्याच वर्षी बिगर मुस्लिम लोकसंख्येचे सरासरी वयोमान ३० वर्ष होते. तरुणांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने मुस्लिमांची संख्या येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Posted by : | on : 3 Mar 2017
Filed under : अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g