Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » ४० देशांचे इसिसला अर्थसाहाय्य

४० देशांचे इसिसला अर्थसाहाय्य

=‘जी-२०’ समूहातील काही देशांचाही समावेश : पुतीन यांचा गौप्यस्फोट=
Vladimir Putinअंटालिया, [१७ नोव्हेंबर] – पॅरिस हल्ल्यानंतर संपूर्ण जग इसिसविरोधात एकत्र आले असतानाच, सुमारे ४० देशांकडून या जहाल दहशतवादी संघटनेला अर्थसाहाय्य केले जाते आणि यामध्ये सर्वशक्तिशाली अशा ‘जी-२०’ राष्ट्रसमूहातील काही देशांचाही समावेश आहे, असा बॉम्बगोळा रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी टाकला आहे.
‘जी-२०’ बैठकीतच त्यांनी जाहीरपणे हा आरोप केला. या राष्ट्रसमूहातील काही देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी मला याबाबतची माहिती दिली आहे. या संस्थांनी मला ४० देशांची यादीच दिली असून, त्यात ‘जी-२०’ राष्ट्रसमूहातील काही देशांचाही समावेश आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
इसिसला या देशांकडून मिळणारा अर्थपुरवठा तातडीने बंद करण्याची आवश्यकता आहे आणि यात सर्वच देशांनी आपले योगदान द्यायला हवे, असेही ते म्हणाले. इसिसकडून काही देशांना बेकायदेशीरपणे तेलाचा पुरवठा होत आहे, तो देखील थांबविण्याच्या आवश्यकतेवर पुतीन यांनी भर दिला.
दरम्यान, रशियाचे विमान इसिसनेच पाडले असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दहशतवादी जगाच्या पाठीवर जिथे दिसतील, तिथेच त्यांना ठार मारण्याचे आवाहन पुतीन यांनी केले आहे. याशिवाय रशियन विमान पाडणार्‍यांचा शोध घेण्याचे निर्देश पुतीन यांनी सुरक्षा यंत्रणांना दिले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25520

Posted by on Nov 18 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1226 of 2458 articles)


=जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था गतिमान= दुबई, [१७ नोव्हेंबर] - संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या सावटात असताना आणि अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची घसरगुंडी ...

×