Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ५३६६ टन जप्त साठा बाजारात

५३६६ टन जप्त साठा बाजारात

=डाळींचे भाव उतरण्याची शक्यता=
FOOD GRAIN price hike1नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] – सुमारे ५३६६ टन इतका जप्त साठा बाजारात आल्याने डाळींचे भाव उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी छापे मारून राज्य सरकारने आजवर तब्बल १.३२ लाख टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर डाळींचा साठा जप्त केला होता.
पावसाच्या पुरेशा पाण्याअभावी यंदा राज्यात डाळीचे उत्पन्न २ दशलक्ष टनने कमी झाले. त्यामुळे बाजारात डाळींचा पुरवठा कमी झाल्याने राज्यभरात १८० रूपये किलो इतक्या महाग भावाने डाळ विकली जात होती.
राज्यांना डाळीच्या साठ्याची मर्यादा ठरवून दिल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात टाकण्यात आलेल्या धाडसत्रात १७ नोव्हेंबरपर्यंत १,३२,७७७.१४ मेट्रिक टन इतका डाळीचा साठा जप्त करण्यात आला होता. दरम्यान राज्य सरकारी सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जप्त साठ्यापैकी ५३६६ टन इतका साठा १७ नोव्हेंबरपर्यंत बाजारपेठांमध्ये जारी करण्यात आला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25534

Posted by on Nov 18 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1216 of 2453 articles)


=कोर्टात आव्हान देण्याची कंपन्यांची तयारी= नवी दिल्ली, [१८ नोव्हेंबर] - एअर कार्गो वाहतुकीसाठी गट तयार करून हवाई इंधन सरचार्ज ठरविल्याचा ...

×