‘नीट’मधून महाराष्ट्राला वगळा

‘नीट’मधून महाराष्ट्राला वगळा

=मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना साकडे= नवी दिल्ली, [१८ मे] – दोन वर्ष ‘नीट’ लागू करू नये, सीईटीच राहू द्यावी, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले. केंद्र सरकार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, यासाठी आवश्यक...

18 May 2016 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त

=अधिभार हटविला= मुंबई, [१७ मे] – पेट्रोल आणि डिझेलवर लावण्यात येणारा राज्य विशेष अधिभार रद्द करण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी झाल्याने राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. डिझेलवर प्रति लिटर ९१ पैसे, तर पेट्रोलवर प्रति लिटर १ रुपया १२ पैसे अधिभार लावला जात होता....

17 May 2016 / No Comment / Read More »

यावर्षी प्रवेश एमएच-सीईटीद्वारेच होऊ द्यावे : तावडे

यावर्षी प्रवेश एमएच-सीईटीद्वारेच होऊ द्यावे : तावडे

नवी दिल्ली, [१६ मे] – महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश यावर्षी एमएच-सीईटीद्वारेच करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याचे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे सांगितले. ‘नीट’ च्या संदर्भात उद्‌भवलेल्या परिस्थितीवर विचार करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय...

16 May 2016 / No Comment / Read More »

निराधार आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा : खडसे

निराधार आरोप करणार्‍यांवर अब्रुनुकसानीचा दावा : खडसे

मुंबई, [१६ मे] – महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजानन पाटील याने ३० कोटी रुपयांची कथित लाच मागितल्या प्रकरणी माझ्यावर निराधार आरोप करणार्‍या व्यक्तीवर मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी स्वत: पुढाकार घेणार आहे. मी स्वत: चौकशीची मागणी यापूर्वीच केली...

16 May 2016 / No Comment / Read More »

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयएची क्लीन चिट

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयएची क्लीन चिट

=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दहा जणांवरील मोक्का आरोपही मागे= मुंबई, [१३ मे] – २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर व इतर पाच आरोपींवरील सर्व आरोप शुक्रवारी मागे घेत त्यांना क्लीन चिट दिली असून, कर्नल प्रसाद...

14 May 2016 / No Comment / Read More »

कॉंग्रेस आघाडीचा हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला: भांडारी

कॉंग्रेस आघाडीचा हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला: भांडारी

मुंबई, [१३ मे] – तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने २००९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हिंदू दहशतवादाचा भ्रम निर्माण करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांना २००८ साली अटक करून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात गोवले होते. परंतु, राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव...

14 May 2016 / No Comment / Read More »

१३ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

१३ वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

=अतुलचंद्र कुलकर्णी दहशतवाद विरोधी पथकाचे नवे एडीजी= मुंबई, [१३ मे] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या असून, मुंबई पोलिस विभागातील गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी (एडीजी) नियुक्ती...

14 May 2016 / No Comment / Read More »

युवकांना प्रोत्साहनासाठी युवारत्न पुरस्कार द्या: राज्यपाल

युवकांना प्रोत्साहनासाठी युवारत्न पुरस्कार द्या: राज्यपाल

मुंबई, [१३ मे] – पुढील पाच वर्षांत भारतीय नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे असणार आहे. त्यामुळे भारत हा सर्वाधिक युवकांचा देश म्हणून गणला जाणार आहे. संगीत, साहित्य, चित्रपट, कला, क्रीडा या क्षेत्रातील युवारत्न शोधून सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कारामध्ये यापुढे युवारत्न पुरस्काराचा समावेश करावा,...

14 May 2016 / No Comment / Read More »

टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा

टंचाईग्रस्त भागात सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवा

=मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश= मुंबई, [५ मे] – राज्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असून या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजना करता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून...

6 May 2016 / No Comment / Read More »

केंद्राकडून रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी ९,१८७ कोटी

केंद्राकडून रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी ९,१८७ कोटी

नवी दिल्ली, [४ मे] – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील रखडलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ९ हजार १८७ कोटी रूपये देणार आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणार्‍या महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मराठवाड्‌यातील मोठ्‌या सिंचन प्रकल्पासाठी ९० टक्के निधी देण्याची...

4 May 2016 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google