richwood
richwood
richwood
Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक » व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी!

व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : २

Management1नुकतेच १२ वी बोर्डाचे निकाल झाले, तणावात असलेले वातावरण निवळत आता थोडे हलके वाटू लागले आहे. १२ वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
आजकाल प्रचंड स्पर्धा आहे. पण त्यावर मात करण्यासाठी अनेक साधने देखील उपलब्ध आहेत. त्याची सुरुवात १० वी नंतर कोचिंग क्लासेस पासूनच सुरु होते. आपल्या पाल्याने कोणता अभ्यासक्रम निवडावा, कोणत्या शिक्षणामुळे त्याच्या आयुष्याला योग्य दिशा मिळेल, याबाबत पालक अधिकाधिक जागरूक आहेतच, परंतु तितकीच आजकालची मुलेदेखील जागरूक आहेत. इंटरनेटमुळे आणि विविध शैक्षणिक माहितीच्या प्रदर्शनांमुळे आपल्या करिअरबाबत माहिती मिळवणे, निर्णय घेणे सोपे झाले आहे.
१२ वी हा आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळेच अनेक मुले व त्यांचे पालक अधिकाधिक जागरुकतेने १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमाची निवड करतात. त्यासाठी, १० वी पासूनच, त्याचे करिअर मॅपिंग, ऍप्टीट्‌यूड टेस्टस, याचा आधार घेत निर्णयाच्या दिशेने कूच चालू असते. आता निकाल लागल्यावर प्रवेशाची गडबड उडाली आहे. प्रत्येक विद्यापीठाची, कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया नियम, तारखा व पद्धत निरनिराळी असते आणि त्याचवेळी कधी कधी ज्यांचा अजून आपण नक्की काय करावं / काय शिकावं याचा निर्णय झालेला नाही, त्यांची अजूनच तारांबळ उडते. पारंपरिक, व्यवसायिक शिक्षणाची वाट न चोखाळता, वेगळे काही करू इच्छिणाऱ्या मुलामुलींसाठी आज अनेक पर्याय आहेत. अगदी ट्रॅव्हल, टूरिझम, हॉस्पिटल व्यवस्थापनापासून एअरपोअर्ट व्यवस्थापन, पर्यावरण व्यवस्थापन असे नाविन्यपूर्ण कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्याला भविष्यात चांगली मागणी असू शकते. फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग हे देखील आता कॉमन आवडीचे झाले आहे. मिडिया आणि मास कम्युनिकेशन याला देखील मागणी आहे.
आज आपण पाहू की १२ वी नंतर व्यवस्थापन (मॅनेजमेंट) क्षेत्रात कोणते अभ्यासक्रम, पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात यापैकी काही अभ्यासक्रमांची मागणी इतकी वाढली आहे की त्यासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतल्या जातात व त्यातील उत्तीर्ण गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जातात. ज्यांना व्यवस्थापन शास्त्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी १२ वी नंतर सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची (एम्. बी. ए. / एम्. सी. ए.) वाट पाहण्याची आवश्यकता नाही. १२ वी नंतर ३ वर्षांचे अनेक पदवी अभ्यासक्रम व्यवस्थापन शास्त्रात देखील उपलब्ध आहेत.
⦁    बी. बी. ए.  (बँचलर्स इन बीझनेस एडमिनिस्ट्रेशन)
⦁    बी. एम्. एस्  (बँचलर्स इन मॅनेजमेंट स्टडिज्)
⦁    बी. एस्. सी. इन मॅनेजमेंट
⦁    बी. एफ्. टी. (बँचलर्स इन फॉरेन ट्रेड)
⦁    बी. कॉम. (विथ मॅनेजमेंट स्पेशलायझेशन)
⦁    बी. सी. ए. (बँचलर्स इन कॉम्प्युटर एप्लीकेशन)
⦁    बी. एच. एम्. (बँचलर्स इन हॉटेल मॅनेजमेंट)
⦁    बी. एच. एच. एम्. (बँचलर्स इन हॉटेल एन्ड हॉस्पिटलीटी मॅनेजमेंट)
या सर्व अभ्यासक्रमांना त्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांची जोड दिल्यास भविष्यात जास्त चांगल्या व्यवसायिक संधी मिळू शकतात. भारतामध्ये सध्या या पदवी अभ्यासक्रमानंतर मिळणाऱ्या नोकऱ्यांमध्ये वेतनश्रेणी २ लाख रुपये (वार्षिक) या पासून सुरु होवून याहून अधिक देखील आहे.
याप्रकारच्या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास यावर जास्त भर दिला जातो. तसेच कॉर्पोरेट इंटर्नशिप याचाही समावेश यामध्ये असतो. त्यामुळे कॉर्पोरेट जगताची तोंडओळखही होते. लगेच नोकरी मिळाली तरी पदव्युत्तर शैक्षणिक संधीही असतात ज्या बहिस्थ अथवा distance learning च्या माध्यमातून साध्य करता येतात.
व्यवस्थापन शास्त्रच नव्हे तर कोणताही अभ्यासक्रम निवडताना काय लक्षात घ्याल?
⦁    आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे?
⦁    आपला कल (aptitude) कोणत्या क्षेत्राकडे अधिक आहे?
⦁    आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे कोणते क्षेत्र असू शकते?
⦁    आपल्यातील कौशल्य गुणांना अधिकाधिक वाव कोणत्या क्षेत्रात मिळू शकेल?
⦁    आपण निवडू इच्छित असलेल्या क्षेत्रामधील भविष्यातील संधी काय आहेत?
⦁    आपण निवडू इच्छित असलेल्या क्षेत्रातील कामाचे स्वरूप कसे आहे?
⦁    आपण निवडू इच्छित असलेल्या व्यावसायिक शिक्षणासाठी उपलब्ध शिष्यवृत्ती व आर्थिक सोयी सुविधा काय आहेत?
⦁    आपल्याला स्वतःची आर्थिक उन्नती करण्यासाठी या शिक्षणाबरोबरच अन्य कोणते शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे का?
⦁    या प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध आहे का?
अशाप्रकारे सारासार विचार करून तुम्ही तुमचा निर्णय पडताळून पाहू शकता व अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकता.
आजकाल अनेक विद्यापीठांमध्ये इंटिग्रेटेड कोर्सेसची देखील सुविधा आहे. तसेच, ३ वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमानंतर अनेक पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा कोर्सेस) करता येतात ज्यामुळे अन्य काही व्यावसायिक संधी मिळू शकतात.
आपली आवड, भविष्यातील संधी व आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसे शिक्षण नेहमीच तुम्हाला कामाचा आनंद देवू शकेल… म्हणूनच जे निवडाल ते विचारपूर्वक व योग्य निवडा. ऑल दी बेस्ट !!!

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: http://vrittabharati.in/?p=22695

Posted by on 4:02 am. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

4 Comments for “व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी!”

  1. V.युजफुल इन्फो.

  2. V.युजफुल

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

एका नजरेत

richwood

FEATURED VIDEOS

मागील बातम्या, लेख शोधा

Search by Date
Search by Category
Search with Google